💥खून प्रकरणातील आरोपीचा बारा तासांत छडा लावल्याबद्दल मालेगाव पोलिसांचा सत्कार...!


💥पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार प्रविण धुमाळ यांनी कर्मचाऱ्यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला💥

फुलचंद भगत

वाशिम:-जिल्ह्यातील मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत, मालेगाव ते मेहकर रोडवर, पांगरी कुटे गावापासून एक किलोमीटर अंतरावर ता.१२ रोजी एका अनोळखी इसमाचा बंदुकीची गोळी झाडून खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली होती. खून प्रकरणातील आरोपींची व मृतकांची ओळख पटविण्याचे आव्हान मालेगाव पोलिसांसमोर उभे राहिले होते. परंतु मालेगाव पोलीसांनी या प्रकरणाचा छडा अवघ्या बारा तासात लावल्याबद्दल दि. 17 रोजी शुक्रवारी दुपारी दोन वा. पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार प्रविण धुमाळ यांनी कर्मचाऱ्यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


  ‌
या वेळी पो.उ.निरिक्षक आकाश महल्ले, सुधीर सोळंके, गजानन वाणी, गजानन झगरे, आषिश किल्लेकर, गजानन ठाकरे, गणेश बोडखे यांचा सत्कार केला.सदर प्रकरणातील आरोपींनी मागे कोणताही सबळ पुरावा सोडला नव्हता.त्यामुळे मालेगाव पोलीसा समोर आरोपींच्या शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. परंतु तुम्ही मोठ्या उत्साहाने व गांभीर्याने तपास करुन मृतकांची ओळख व आरोपींचा शोध घेतला अशाच प्रकारचा उत्साह कायम ठेऊन पोलिस प्रशासनाची शान वाढविण्यासाठी प्रयत्न करीत राहावे असे आवाहन ठाणेदार प्रविण धुमाळ यांनी यावेळी केले. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन गोपनीय विभागाचे सुधिर सोळंके यांनी केले.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या