💥साकीनाका बलात्कार प्रकरण:-राज्य सरकारने हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांशी बोलून फास्ट ट्रॅकवर खटला चालवावा...!


💥राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली मागणी💥

✍️ मोहन चौकेकर

मुंबई :-मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरण माणुसकीला आणि मुंबईच्या आजवरच्या लौकिकाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. अशी प्रकरणं वारंवार होत राहिली तर असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करुन फाशीच झाली पाहिजे, असं मत राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. फडणवीसांनी यावेळी याप्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सल्ला देखील दिला आहे.

राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घालून तातडीनं मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांशी बोलून एक विशेष जलदगती न्यायालय स्थापन करुन यात खटला चालवला जाईल यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि पोलिसांनी याप्रकरणाशी निगडीत इतर आरोपींचा तातडीनं शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

💥राष्ट्रवादीची प्रतिक्रिया:-

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. या महिलेसोबत दुष्कर्म करण्यात आला होता. त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. पण आरोपीला अटक केल्यानंतर निश्चित रुपाने सरकार लवकरात लवकर चार्जशीट दाखल करेल. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू, तसा आग्रह गृहमंत्र्यांना धरू. लवकरात लवकर कडक शिक्षा मिळाली पाहिजे. या शिक्षेने आरोपींच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे अशी शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं मलिक यांनी सांगितलं....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या