💥परभणी येथील नवा मोंढा पोलिस स्थानकातील धाडसी पोलिस कर्मचारी रामेश्वर खेत्री यांनी पकडले दोन मोबाईल चोरटे...!


💥साध्या वेशात पाळत ठेवून रंगेहात ताब्यात घेतले मोबाईल चोरट्यांना💥

परभणी (दि.१८ सप्टेंबर) - शहरातील काळीकमान परिसरात आज शनिवार दि.१८ सप्टेंबर रोजी सायं.०६-०० वाजेच्या सुमारास नवा मोंढा पोलिस स्थानकातील धाडसी पोलिस कर्मचारी रामेश्वर खत्री यांनी साध्या वेशात पाळत ठेवून मोबाईल चोरांच्या टोळीस रंगेहात पकडण्याची धाडसी कारवाई केली यावेळी मोबाईल चोरट्यांच्या टोळीतील दोन चोरटे हाती लागले असून यात एक अल्पवयीन असल्याचे समजते.


परभणी शहर परिसरासह जिल्ह्यातील ज्याही लोकांचे मोबाईल चोरीस गेलेले आहेत त्यांनी नवा मोंढा पोलीस स्टेशन संपर्क साधावा असे आवाहन नवा मोंढा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे...


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. रामेश्र्वर खेत्री यांच्या सारखे कर्तव्य दक्ष पोलिस असतील तर मोठे गुनेगार यांना आळा बसेल.

    उत्तर द्याहटवा