💥शिवेक्य तपोरत्न श्री शिवाचार्य महास्वामी माजलगावकर महाराजांचे कार्य समाजाला प्रेरणा देत राहील - धनंजय मुंडे


💥माजलगावकर महाराजांच्या समाधीस्थळी पालकमंत्री धनंजय मुंडे नतमस्तक,आदरांजली केली अर्पित💥

माजलगाव : माजलगाव येथील श्री मिस्किन स्वामी संस्थानचे मठाधिपती शिवेक्य तपोरत्न प्रभू पंडिताराध्य श्री शिवाचार्य महास्वामी माजलगावकर महाराज यांची शिकवण, गोर गरिबांप्रति कणव यासह समाजाला समर्पित जीवन हे सदैव प्रेरणा देत राहील असे मत सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. 


ना. मुंडे यांनी माजलगाव येथे मठात जाऊन माजलगावकर महाराजांच्या समाधी स्थळी नतमस्तक होऊन दर्शन घेतले व महाराजांना आदरांजली अर्पण केली. तसेच नूतन मठाधिपती चंद्रशेखर महाराज यांचे आशीर्वादही घेतले जीवनात माजलगावकर महाराजांचे दर्शन, आशीर्वाद व मार्गदर्शन मिळण्याचा लाभ अनेकदा आला. त्यांच्या निधनाने अतीव दुःख झाले श्री मिस्किन स्वामी संस्थान हे एक संत अधिष्ठान आहे, आपण येथे पुढेही येत राहू असे यावेळी ना. मुंडे म्हणाले. यावेळी ना. मुंडे यांच्यासह आ. प्रकाशदादा सोळंके, आ. संजीव भैय्या क्षीरसागर, अशोक आबा डक, बजरंग बप्पा सोनवणे, जयसिंह सोळंके यांसह आदी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या