💥केद्रीय रेल्वे रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची दक्षिण मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या सोबत आढावा बैठक संपन्न...!


💥या वेळी अप्पर महाव्यवस्थापक अरुण कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते💥

          श्री रावसाहेब पाटील दानवे, माननीय राज्य मंत्री रेल्वे , कोळसा, खनिज यांनी आज दिनांक 24 सप्टेंबर, 2021 रोजी रेल नीलायम, सिकंदराबाद येथील दक्षिण मध्य रेल्वे च्या मुख्यालयास भेट दिली आणि श्री गजानन माल्या , महाव्यवस्थापक यांच्या सोबत दक्षिण मध्य रेल्वे ची आढावा बैठक घेतली. या वेळी श्री अरुण कुमार, अप्पर महाव्यवस्थापक, आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 मंत्री महोदयांनी दक्षिण मध्य रेल्वे च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची त्यांनी दक्षिण मध्य रेल्वे च्या विविध क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगती बद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पायाभूत सुविधे मध्ये वाढ करण्याबरोबरच प्रवासी सुविधे मध्ये सुद्धा वाढ करण्याच्या कार्यात वेग साधण्याचे आवाहन केले. तसेच विविध कार्यातील ध्येय पूर्ण करण्याचे आवाहन केले. आदरणीय मंत्री महोदयांनी मालवाहतुकीमध्ये अधिक वाढ करण्याचे आवाहन केले. औरंगाबाद, जालना सारख्या शहरांतून माल वाहतूक वाढविण्याकरिता विविध उपाय योजना करण्याचे आवाहन केले. मालवाहतुकी मध्ये वाढ करण्याकरिता विविध विविध रसद कंपन्या सोबत बैठका आयोजित करण्याचे आणि त्यांना रेल्वे मधून माल वाहतूक करण्यास   प्रोत्छाहन देण्याचे आवाहन केले. तसेच इतर मार्गामधून सुधा रेल्वे चे उत्पन्न वाढविण्याचे आवाहन केले.


 श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दक्षिण मध्य रेल्वे मधील विविध रेल्वे स्थानकावर वापरत असलेल्या सुरक्षा क्यामेरा यंत्रणेचे  (CCTV NETWORK) विशेष कौतुक केले. प्रवासी सुविधे मध्ये आणखी वाढ करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी दक्षिण मध्य रेल्वे मध्ये किसान रेल्वे, दुध दुरोन्तो, विशेष गाड्या, उत्सव विशेष गाड्या  चालविल्या बद्दल अभिनंदन केले. कोविड-19 च्या संकटात विविध रेल्वे हॉस्पिटल्स नि केलेल्या कार्याचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

श्री गजानन माल्या, महाव्यवस्थापक दक्षिण मध्य रेल्वे यांनी दक्षिण मध्य रेल्वे करत असलेल्या विविध कार्याबद्दल आदरणीय मंत्री महोदयांना माहिती दिली. विविध रेल्वे स्थानकावर लिफ्ट्स, एस्केलेटर्स, तसेच इतर प्रवाशी सुविधा वाढविल्या बद्दल हि माहिती दिली. तसेच प्रवासी सुविधे बरोबरच प्रवाशी सुरक्षे मध्ये करत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी माहिती दिली. ग्रीन इन्विरोंमेंट , सौर  उर्जा, स्वच्छता इत्यादी बद्दल हि माहिती दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या