💥पूर्णा तालुक्यातील मौजे आडगाव बरबडी सुहागन आव्हई या गावातील एजी सिंगल फेस लाईट रात्रीच्या वेळी सुरु ठेवा...!


💥शिवशासन ग्रुपच्या वतीने देण्यात आले विद्युत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन💥

पूर्णा (दि.११ सप्टेंबर) - तालुक्यातील मौजे आडगाव बरबडी सुहागन आव्हई या भागातील एजी सिंगल फेस लाईट रात्रीच्या वेळी सुरू ठेवण्यात यावी या संदर्भात विद्युत महावितरण कंपनी पुर्णाच्या अधिकाऱ्यांना आज शनिवार दि.११ सप्टेंबर २०२१ रोजी शिवशासन ग्रुपच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की सध्या पावसाळ्या मुळे शेतात खुप मोट्याप्रमाणात गवत वाढले आहेत शेतात जायला रस्ते नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना जिव मुटीत धरुन शेतात आपल्या आखाड्यावर झोपाव लागत आहे अंधाराचा फायदा घेऊन अनेक हिंसक प्राणी शेतकऱ्यांवर हल्ला करत आहे पिकांची नासधूस करत आहेत लेकरासारखी वाढवलेले पिक पाहता पाहता उध्वस्त करत आहेत त्यातच अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान व याही पेक्षा दुर्दैवी बाब म्हणजे निसर्गाच्या प्रकोपा नंतर उर्वरीत पिक या प्राण्यां

नमुळे हातची जात आहे अश्या या गंभीर समस्येमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळाल आहे त्यातच परिसरात चोराचे प्रमाण सुद्धावाढले आहे तसेच रात्री आनेक शेतकऱ्यांना साप चावल्याच्या घटना परिसरात घडत आहेत या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या सेवेसाटी रात्री शेतात सिगल फेस लाईट चालु टेवावी आशी मागनी शिवशासन ग्रुपच्या वतीने करण्यात आली या निवेदन देते वेळी कैलास पडोळे,विलास गिरी सरपंच आह्वई सोनाजी सोलव अविनास सोलव माधव सोलव गणेश शिदे तसेच आडगाव बरबडी सुहागन आव्हईचे असंख्य नागरीक यावेळी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या