💥परभणी जिल्हास्तरीय वुशू कराटे स्पर्धा : सेलूतील १७ खेळाडूंना सुवर्णपदक...!

 


💥जिल्हास्तरीय वुशू चॅम्पियनशिप स्पर्धेत दीडशे खेळाडूंचा सहभाग💥

सेलू (दि.७ सप्टेंबर) : परभणी जिल्हा वुशू कराटे असोसिएशनच्या वतीने आयोजित १९ वी जिल्हास्तरीय वुशू चॅम्पियनशिप सब जूनियर, जुनियर, सीनियर स्पर्धेत सेलू येथील १७ खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावले आहे.

परभणी येथील युद्ध कला क्रिडा प्रबोधनी हॉल, गजानन नगर कारेगाव रोड येथे रविवारी, ५ सप्टेंबर रोजी या स्पर्धा पार पडल्या. परभणी जिल्ह्यातून सेलू ,पूर्णा ,गंगाखेड ,जिंतूर तालुक्यातील दीडशे खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत सेलू येथील खेळाडूंनी विविध गटांत  उत्कृष्ट प्रदर्शन करत दुसरा क्रमांक मिळविला. 

💥अध्यक्षस्थानी उपशहर प्रमुख ;-

दिलीप गिराम, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.टाक, गायकवाड,यादव पंकज सोनी, मगर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी मार्गदर्शन करताना आयोजक मास्टर पांडुरंग अंभोरे म्हणाले, की आजच्या युगामध्ये मुलींनी सूर्यासारखे तेजस्वी बनावे  मुलींनी मोबाईल घेण्यापेक्षा स्वसंरक्षण करण्यासाठी तयार झाले पाहीजे. स्पर्धेसाठी पंच म्हणून दत्ता गरुड, सूर्यकांत मोगल, सृष्टी अंभुरे, वैष्णवी कदम, ओमकार कदम, शिवानी कदम यांनी काम पाहिले.

💥सेलू तालुक्यातील सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंची नावे अशी : -

सपना खरात, अमृता डिग्रसकर श्रीशा डिग्रसकर, तेजस्वीनी महाजन, सोहम मगर, शंतनू मालाणी, स्वरूप मालाणी, शिवम मगर,आदित्य ताठे, दर्शन डख, प्रणव मगर, ऋषीकेश पेठारे, विश्वराज पौळ, मानसी कुलकर्णी, भक्ती रवंदळे, ओमकार रवंदळे, तीर्थेश संगई. या सर्व खेळाडूंची  वर्धा येथे २३ ते २९ सप्टेंबर या कालावधीत आयोजित राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

________________________

वृत्तांकन : बाबासाहेब हेलसकर

________________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या