💥मुंबईच्या शिवसेना नगरसेवकांच्या एका फोनने सुटला मंगरुळपीरच्या रखडलेल्या घरकुल निधीचा प्रश्न......!


💥मंगरूळपीर नगरपरिषद समोर सुरु झाले होते साखळी उपोषण💥

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर नगरपरिषदेअंतर्गत प्रधानमंञी आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांचा निधी कीत्येक दिवसापासुन रखडलेला आहे.याविषयी घरकुल लाभार्थ्यांनी वारंवार प्रशासनाकडे लेखी व तोंडी मागणीही केली परंतु शहरवाशीयांना वार्‍यावर सोडणार्‍या न.प.प्रशासनाने या बाबीकडे हेतुपुरस्सर कानाडोळा केल्याचा आरोप करत या घरकुल लाभार्थ्यांनी दि.१५ सप्टेबरपासुन साखळी ऊपोषणास सुरुवात केली होती.मुंबईचे शिवसेनेचे नगरसेवक वाशिम जिल्हा भेटीवर आले असता मंगरूळपीरच्या न.प.अंतर्गतच्या घरकुल निधीचा प्रश्न समजला.त्यांनी याविषयीची माहीती घेवुन लगेच मुंबई मंञालयात याविषयी जाब विचारुन तात्काळ निधी ऊपलब्ध करुन देन्याची मागणी करताच लगेच प्रशासनाने ६५४००००/- रुपये न.प.च्या खात्यात वळती केल्याने आता घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न सुटण्यास मार्ग मोकळा झाला.

शासनाने गोर-गरीब जनतेला रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राहण्या जोगे पक्के घर बांधुन मिळत असते त्यासाठी लाभार्थी हा रीतसरपने सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल करतो. परंतु ह्या लाभार्थ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल कागदपत्रांची संपूर्ण पूर्तता असूनही त्यांचा निधी रखडल्या जातो व त्यांचा मानसिक छळ केल्या जातो.हिच बाब मंगरुळपीर शहरातील नगरपरिषदेच्या घरकुल निधी विषयात घडलेली दिसते. प्रधानमंञी आवास योजनेमधील रखडलेला निधी मागणीकरीता मंगरुळपीर शहरातील घरकुल लाभार्थी व जागरूक नागरिक  लाभार्थ्यांनी दि.१५/९/२०२१ रोजी १० वाजता पासुन मंगरूळपीर नगरपरिषद समोर साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.याचदरम्यान या विषयाची माहीती वाशिम जिल्हा भेटीवर आलेले मुंबईचे शिवसेनेचे लोकप्रिय नगरसेवक संजुभाऊ वडे यांना मिळाली.त्यांनी स्थानिक विश्रामगृहावर याविषयी घरकुल लाभार्थ्यांशी चर्चा करुन माहीती घेतली.नव्यानेच रुजु झालेल्या मुख्याधिकार्‍यांशी चर्चा करुन आणी लगेच मुंबई मंञालयामध्ये फोन घुमवला.नगररचना विभागातुन रखडलेल्या घरकुल निधीविषयी विचारणा केली.तिकडुन सकारात्मक प्रतिक्रीया आल्या आणी काही वेळातच मंगरुळपीर न.प.च्या खात्यात ६५४००००/- रुपये याकरीता प्राप्त झाले.भाऊंच्या एका फोनने मंगरुळपीरवाशीयांच्या घरकुल लाभार्थ्यांचा विषय मार्गी लागल्याने सर्वांनी मुंबईचे नगरसेवक संजुभाऊ वडे यांचे आभार मानले.या विषयासाठी आमदार साहेब,म.पीरच्या नगराध्यक्षा,भाजपाच्या पदाधिकार्‍यांनीही पाठपुरावा केला.


प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या