💥परळी : अतिवृष्टीबाधित गावांना पालकमंत्री ना. धनंजय मुंडे शनिवारी भेटी देऊन पाहणी करणार....!


💥शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी पुन्हा बांधांवर जाऊन करणार नुकसानीची पाहणी💥

परळी (दि. 10 सप्टेंबर) - : परळी मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही गावांमध्ये शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे उद्या (शनिवारी) या गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. 

परळी तालुक्यातील डिग्रस येथे सकाळी 9 वाजल्यापासून ना. मुंडेंचा पाहणी दौरा सुरू होणार असून, पुढे पोहनेर, बोरखेड, तेलसमुख, ममदापूर आदी गावातील शेती व अन्य नुकसानीची प्रत्यक्ष बांधांबर जाऊन ना. मुंडे हे पाहणी करणार आहेत यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्या समवेत स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या