💥मंगरूळपीर नगरपरिषद समोर साखळी उपोषणास सुरुवात....!


💥प्रधानमंत्री आवास योजनेचा रखडलेला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-मंगरुळपीर नगरपरिषदेअंतर्गत प्रधानमंञी आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांचा निधी कीत्येक दिवसापासुन रखडलेला आहे.याविषयी घरकुल लाभार्थ्यांनी वारंवार प्रशासनाकडे लेखी व तोंडी मागणीही केली परंतु शहरवाशीयांना वार्‍यावर सोडणार्‍या न.प.प्रशासनाने या बाबीकडे हेतुपुरस्सर कानाडोळा केल्याचा आरोप करत या घरकुल लाभार्थ्यांनी दि.१५ सप्टेबरपासुन साखळी ऊपोषणास सुरुवात केली आहे.


 शासनाने गोर-गरीब जनतेला रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राहण्या जोगे पक्के घर बांधुन मिळत असते त्यासाठी लाभार्थी हा रीतसरपने सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल करतो. परंतु ह्या लाभार्थ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल कागदपत्रांची संपूर्ण पूर्तता असूनही त्यांचा निधी रखडल्या जातो व त्यांचा मानसिक छळ केल्या जातो.हिच बाब मंगरुळपीर शहरातील नगरपरिषदेच्या घरकुल निधी विषयात घडलेली दिसते. प्रधानमंञी आवास योजनेमधील रखडलेला निधी मागणीकरीता मंगरुळपीर शहरातील घरकुल लाभार्थी व जागरूक नागरिक  लाभार्थ्यांनी दि.१५/९/२०२१ रोजी १० वाजता पासुन मंगरूळपीर नगरपरिषद समोर साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा पदाधिकारीही कार्य करीत आहेत व त्यांनीही या साखळी ऊपोषणाला भेट देवुन व्यथा जाणुन घेवून प्रशासनाकडे मागणी रेटुन धरणार असल्याचे मत व्यक्त केले. यामध्ये पाहण्यासारखे आहे की नव्याने रुजू झालेले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच न.प.च्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा हे किती तत्परतेने सर्व लाभार्थ्यांना त्यांचा रखडलेला निधी देतात किंवा फक्त आश्वासनाची खैरात देऊन त्यांच्या उपोषणाची सांगता करतात याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे....

प्रतिनिधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या