💥पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळीत नवीन रोहित्र बसवण्यासह अखंडीत विजपुरवठा करण्याची मागणी...!


💥गावातील नागरिकांनी दिले महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्यांना निवेदन💥

पुर्णा ; तालुक्यातील धनगर टाकळी गावकऱ्यांच्या वतीने आज मंगळवार दि.२१ सप्टेंबर २०२१ रोजी गावातील गावठाणची लोडशेडिंग कमी करणे व अखंडित विजपुरवठ्या करिता नवीन रोहित्र बसवण्याच्या मागणी करिता विद्युत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नवीन वस्तीत डिपी मंजूर करणे बाबत आणि गावात जी आठ ते दहा तास लोडशेडींग आहे ती बंद करणे बाबत मागणी करण्यात आली, गावात २० ते २५ वर्षांपासून सतत लोडशेडींगची समस्या राहिली आहे त्यामुळे धनगर टाकळी गावाचा विद्युत पुरवठा सारंगी उपकेंद्र तून चालू करण्यात यावा जेणेकरून अखंडित वीजपुरवठा होण्यास मदत होईल.

त्यासंदर्भात मा. उपकार्यकारी अभियंता उपविभाग पूर्णा येथे धनगर टाकळी गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. त्यावेळी मा. उपकार्यकारी अभियंता साहेबांनी संपूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या