💥जायकवाडीच्या कालव्यांची दुरुस्ती करणार; पूर्णा नदीवर चार बंधारे : जलसंपदा मंत्री जयंत पाटील


💥नवीन चार बंधाऱ्यां पैकी तीन बंधारे परभणी जिल्ह्यात एक बंधारा वसमत तालुक्यात असेल असेही पाटील म्हणाले💥

परभणी (दि.२४ सप्टेंबर) - परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जायकवाडीच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती करीता तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल व कालव्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील अशी ग्वाही दिली.

राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे काल गुरुवार दि.२३ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून आज शुक्रवार दि.२४ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जलसंपदा मंत्री पाटील यांनी जायकवाडीच्या कालव्याच्या दुरावस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. हेडपासून टेलपर्यंत सुरळीतपणे पाणीपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून डाव्या कालव्याच्या दुरुस्तीची कामे निश्चितच हाती घेतली जातील असे ते म्हणाले यावेळी पुढे बोलतांना जलसंपदा मंत्री म्हणाले की पूर्णा नदीवर चार ठिकाणी बंधारे उभारण्यास पाटबंधारे खात्याने मंजुरी बहाल दिली आहे,त्या चार पैकी तीन बंधारे परभणी जिल्ह्यात एक बंधारा वसमत तालुक्यातील असेल अशी ही नमूद केले.

 यावर्षी सर्वदूर पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे,त्यामुळे सर्व छोटे,मध्यम मोठे सिंचन प्रकल्प सुरू झाले आहेत,गेल्या काही वर्षातील पावसाचे वाढते प्रमाण ओळखुन भविष्यात प्रकल्प उभारणीच्या वेळी या पावसाच्या सरासरीचा निश्चितच विचार केला जाईल असेही नमूद केले.

 या पत्रकार परिषदेस खासदार श्रीमती फौजिया खान,आमदार डॉक्टर राहुल पाटील जिल्हाधिकारी आँचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना ही उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या