💥मे.सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदांसाठी केंद्र सरकारकडे आठ न्यायाधीशांच्या नावांची शिफारस...!

 


💥मे.उच्च न्यायालयांतील अन्य २८ न्यायाधिशांची बदली करण्याची शिफारस न्यायवृंदाने केली आहे💥

मे.सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने मे.उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यासाठी आठ न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली मे.त्रिपुरा उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती अकिल कुरेशी यांची बदली मे.राजस्थान उच्च न्यायालयात करावी अशी शिफारसही न्यायवृंदाने केली आहे. 

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय न्यायवृंदाने या शिफारशी केल्या आहेत मे.उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी करण्यात आलेल्या आठ शिफारशींत मे.कलकत्ता उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदल याचाही समावेश आहे त्यांची बदली मे.अलाहाबाद उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मे.उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्तीसाठी

न्या. बिंदल यांच्यासह

न्या. प्रकाश श्रीवास्तव,

 न्या. प्रशांतकुमार मिश्रा,

 न्या. रितू राज अवस्थी, 

न्या. सतीशचंद्र शर्मा,

 न्या. रणजित व्ही. मोरे, 

न्या. अरविंद कुमार, आणि

 न्या. आर. व्ही. मलिमथ यांचा समावेश आहे. 

न्या. श्रीवास्तव, मिश्रा आणि अवस्थी यांची शिफारस मे.कलकत्ता, आंध्र प्रदेश आणि मे.कर्नाटक उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी करण्यात आली आहे तर न्या.शर्मा,मोरे,अरविंद कुमार आणि मलिमथ यांची शिफारस तेलंगणा, मेघालय, गुजरात आणि मे.मध्य प्रदेश उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी झाली आहे विविध मे.उच्च न्यायालयांच्या पाच विद्यमान मुख्य न्यायमूर्तींसह मे. उच्च न्यायालयांतील अन्य २८ न्यायाधिशांची बदली करण्याची शिफारस न्यायवृंदाने केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या