💥राज्यातील गुन्हेगारांवर वचक बसवा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पोलिस प्रशासनाला आदेश...!


💥महिला आणि बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आयोजित गृह विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते💥

मुंबई  : माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही त्यांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजनांबाबत तडजोड केली जाणार नाही त्यासाठी पोलिसांना पूर्ण पाठबळ देण्यात येईल अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी आवश्यक ती कारवाई करा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिला महिला आणि बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आयोजित गृह विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

 पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते राज्यातील महिला सुरक्षेबाबत धोरण म्हणून कोणते प्रयत्न करता येतील याचा विचार करावा लागेल पदपथ, रेल्वेस्थानक, बसस्थानक अशा ठिकाणी आसरा घेणाऱ्या महिलांसाठी किमान रात्रीच्या निवाऱ्यासाठी सोय करता येईल का ? याबाबत केंद्राच्या सहकार्याने प्रयत्न करावे लागतील सुविधांचा अभाव राहू नये यासाठी मूलभूत बाबींकडे धोरण म्हणून लक्ष द्यावे लागेल अनेक घटनांमध्ये तपास केंद्रीय यंत्रणांकडे द्या अशी मागणी केली जाते अशा अनेक प्रकरणातील तपास आपण सक्षमपणे केला आहे. 

त्यामुळे अशा प्रतिक्रियांमधून पोलिसांचे नीतिधैर्य, मनोबल यांचे खच्चीकरण होऊ  नये याची जबाबदारी सर्वांनाच घ्यावी लागेल महिला अत्याचारातील नराधमांना वचक बसेल अशा कारवाईतून आणि शिक्षेतून त्यांना इशाराही द्यावा लागेल त्यासाठी पोलिसांच्या सर्व प्रयत्नांना सरकार म्हणून सर्व ते पाठबळ दिले जाईल राज्याच्या शक्ती कायद्याबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल, आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केला जाईल असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या