💥परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील गणेशवाडी येथील बलोरे कुटुंबियांना खा.जाधव यांची ५० हजार रुपयांची मदत...!


💥शेतकऱ्याने मुलीसह पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली होती त्यामुळे बलोरे कुटुंब उघड्यावर पडले💥

परभणी ; जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील गणेशवाडी येथे एका शेतकऱ्याने मुलीसह पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली होती तरी कुटुंब उघड्यावर पडले या बलोरे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव आज रविवारी या गावात पोहोचले वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण महाराष्ट्र चे संस्था पक अध्यक्ष डॉ. मदन लांडगे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम त्यांच्यासमवेत होते या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता खासदार संजय जाधव यांनी 50 हजार रुपयांची मदत यावेळी दिली असे डॉक्टर मदन लांडगे यांनी सांगितले.


खा.संजय जाधव , वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण महाराष्ट्र चे संस्था पक अध्यक्ष डॉ. मदन लांडगे, सोशल मिडिया प्रमुख सोमेश्वर लाहोरकर,जिल्हा प्रमुख विशाल कदम ,गंगाप्रसाद आनेराव,सुरेश वसमतकर, गणपती निलंगे,बाळासाहेब बलोरे ,डॉ. ओंकार चिंचोले उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या