💥बिसीसीआय ची मोठी घोषणा ; आयपीएल मॅचेस पाहण्यासाठी प्रेक्षाकांना मैदानात प्रवेश मिळणार....!


💥येत्या रविवारपासून रंगणार आयपीएल'चा थरार💥

 ✍️ मोहन चौकेकर

आयपीएल च्या 14 हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मॅचचा मैदानात बसून आनंद घेता येणार आहे.आयपीएलच्या सामन्यात प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली.

 💥येत्या रविवारपासून रंगणार आयपीएल'चा थरार💥

 इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली. यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून म्हणजेच रविवारपासून IPL'चे सामने खेळवले जाणार आहेत उद्यापासून तिकीट विक्री सुरु - क्रिकेट फॅन्स उद्यापासून सामन्यांचे तिकीट ऑनलाईन बूक करू शकतील. आयपीएल च्या अधिकृत वेबसाईट www.iplt20.com वरून प्रेक्षकांना तिकिटे खरेदी करता येतील.

 दरम्यान, किती प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळेल याबद्दल काहीही सांगितले गेले नाही. तसेच यूएई सरकारच्या कोरोना संबंधित नियमांचे पालन केले जाणार आहे..... 

✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या