💥भाजपाचे कांदिवलीतील आमदार अतुल भातखळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक टीका...!


💥शरद पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का ? आ.भातखळकर यांचा सवाल💥

मुंबईतील साकीनाका परिसरामध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला या प्रकरणावर सर्वच स्तरांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत भारतीय जनता पार्टी कडून या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. 

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गंभीर बनल्याची टीका केली जात आहे. त्यातच भाजपाचे कांदिवलीतील आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे आपल्या ट्वीटर हँडलवरून अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. 

💥“फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे…” 

आपल्या ट्वीटमध्ये अतुल भातखळकर यांनी, “इकडच्या-तिकडच्या फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते शरद पवार तूर्तास वामकुक्षी घेत आहेत का?” अशा शब्दांत खोचक सवाल केला आहे राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना सातत्याने अतुल भातखळकर लक्ष्य करताना दिसतात यामध्ये राज्यातील राजकीय मुद्द्यांपासून अनेक नागरी समस्या, तसेच करोनासंदर्भातलं नियोजन या गोष्टींवरून देखील त्यांनी राज्य सरकारवर ट्वीटरच्या माध्यमातून टीका केली आहे. 

💥“आम्ही भाषणाच्या पलिकडे काही करू शकलो नाही ही हार आहे आमची”

चित्रा वाघ यांना भावना अनावर! अतुल भातखळकर यांच्याआधी भा.ज.पा.च्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी  सकाळी राजावाडी रुग्णालयात पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना भावनिक प्रतिक्रीया दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या