💥राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या ताफ्यात अज्ञात कार शिरल्याने खळबळ.....!


💥मुख्यमंत्री गृहविभागासोबतची बैठक संपवून आपल्या घराकडे निघाले त्याच दरम्यान एक अज्ञात कार ताफ्यात शिरली💥 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात अचानक एक अज्ञात कार शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सायंकाळच्या सुमारास मुंबईत ही घटना घडली आहे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अचानक गाडी शिरल्याने एकच खळबळ उडाली ही एका व्यापाऱ्याची कार असल्याची माहिती समोर आली आहे.

एबीपी. माझाच्या वृत्तानुसार सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साकीनाका अत्याचार प्रकरणाबाबत गृहविभागासोबतची बैठक संपवून आपल्या घराकडे निघाले होते त्याच दरम्यान एक अज्ञात कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरली ही मर्सिडिज कार एका व्यापाऱ्याची असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी संबंधित गाडीच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अचानक गाडी शिरल्याने एकच खळबळ उडाली होती मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सुरक्षेसाठी असलेल्या रक्षकांनी त्या अज्ञात वाहन चालकाला ताफ्यातून बाहेर पडण्याचा इशारा केला होता पण त्याने गाडी थांबवली नाही पुढे पोलिसांनी तात्काळ या वाहनचालकाला थांबवले आणि त्याची चौकशी केली.

त्यानंतर मर्सिडीज चालक मलबार हिल परिसरात राहणारा व्यापारी असल्याचे समोर आले आहे दरम्यान, बेजबाबदारपणे गाडी चालवल्याने मर्सिडीज चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला कलम ४१ अ नुसार नोटीस बजावली आहे हा व्यापारी जिममधून परतत असताना त्याने कानात ईअरफोन्स लावले होते अशी माहिती समोर आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या