💥परभणी जिल्ह्यात चोरी घरफोडी सारखे गुन्हे घडवून धुमाकून घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; २३ गुन्हे उघड...!


💥लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ; धाडसी पोलिस अधिकारी विशाल बहात्तरे यांच्या टिमचे सर्वस्तरातून होत आहे कौतुक💥

परभणी (दि.१९ सप्टेंबर) - श्री.गणपती विसर्जनाच्या पुर्वसंधेला सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणूक पुर्व बंदोबस्ताचे टेन्सन असतांनाही आपल्या कर्तव्याची यशस्वीपणे जवाबदारी पार पाडीत अत्यंत धाडसी व कर्तबगार अधिकारी म्हणून परभणी जिल्हा पोलिस दलात आपल्या कर्तृत्वाने नावाजलेले पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री विशाल बहात्तरे यांनी तपासाची चक्र यशस्वीपणे फिरवत संपूर्ण जिल्ह्यात चोऱ्यांसह घरफोड्या घालीत धुमाकूळ माजवणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळत तब्बल २३ गुन्हे उघडकीस आणल्याने धाडसी पोलिस अधिकारी श्री बहात्तरे यांच्यासह त्यांच्या कर्तबगार टिमचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.    

सविस्तर वृत्त असे की जिल्ह्यातील पालम पोलिस स्थानकात दि. १२ जुलै २०११ रोजी फिर्यादी गोविंद रामराव सुरनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ते दि.१२ जुलै २०२१ रोजी पालम तालुक्यातील मौजे बनवस येथील राहते घरी कुटुंबासह जेवण करून रात्री झोपी गेले असता सकाळी झोपेतून उठून पाहील्यानंतर कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे राहाते घराचे चायनल गेटला लावलेले कुलूप तोडुन आत प्रवेश करून कपाटाचे लॉक तोटुन कपाटामध्ये सोन्या-चादीचे दाग दागीने व नगदी मुद्देमाल कोणी तरी अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यावरून पोलीस स्टेशन पालम येथे अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुरनं.१६१/२०२२१ कलम ४५७,२८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मौजे बनवस येथील घरफोडीचे घटनास्थळी भेट देवून गुन्हा उघड करणे कामी पथक तयार करण्यात आले व संबंधित घटनेतील आरोपीतांचा माग काढणे बद्दल उपयुक्त सुचना देण्यात आल्या परभणी जिल्ह्यातील विशिष्ट गुन्हेगारांची पथकाने गुप्त बातमीदारा मार्फत सदर विशेष सखोल चौकशी सुरू केली होती यानंतर दि.१७.जुलै २०२१ रोजी तुकाराम कॉलेज मैदाना मध्ये पाल टाकुन राहणारा आरोपी नामे सुरेश उर्फ गुप्ता,जगदीश ऊर्फ शंकर शिंदे रा. करमताडा तालुका मोनपठ जिल्हा परभणी. ह.मु.टोकवाडी तालुका परभणी जिल्हा बिड यास घेवून त्याकडुन एकूण चार गुन्हे धडकीस आणले होते. सदर आरोपीस पालन पोलीस स्थानकात दाखल गुरनं. १६१/२०२१ कलम ४५७,३८० भादवि या गुन्हयात अटक करून त्याचे कडून विविध गुन्ह्यातील गेलेल्या मुद्देमाला पैकी एकूण अकरा तोळे सोने व नगदी १ लाख ४१ हजार ५०० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या आरोपीने सदर गुन्हा त्याचे इतर साथीदाराचे मदतीने केल्याचे उघड झाले होते त्यावरून दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी यातील पाहीजे असलेले आरोपी परळी तालुक्यातील मौजे पांगरी येथे असल्याची माहिती पालम पोलिस स्थानकाचे धाडसी व कर्तबगार सहाय्यक पोलिस निरिक्षक विशाल बहात्तरे यांना मिळाली असता जिल्हा पोलीस अधिक्षक जयंत मिना यांचे आदेशाने त्यांनी संयुक्त पथक बनवून सदर परिसरात पाठवून आरोपी पकडणेकरीता सापळा लावून या गुन्हयात पाहीजे असलेला आरोपी नामे अंबू ऊर्फ शिवराज जगदीश ऊर्फ शंकर शिंदे व विधीसंघर्षग्रस्त बालक हे दोन जण सदर ठिकाणी मिळून आल्याने त्यांना विश्वासाने विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदारासह परभणी जिल्हयात विविध ठिकाणी परफोडी दरोडा असे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपीताकडून आतापावेतो ८ तोळा सोने व ४४ तोळे चांदी तसेच २,४१००/- रुपये नगदी असा एकूण रुपये ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वरील आरोपीनी परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.परभणी जिल्ह्यातील अद्याप पावेतो एकुण तेवीस गुन्हे उघड झाले असून सदर अटक आरोपीतांनी अजुन चोरी / घरफोडी सारखे गुन्हे इतर जिल्हयात व राज्यात केल्याचा संशय आहे. पोलीस स्टेशन पालम येथील गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री विशाल बहात्तरे करीत आहेत. सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अप्पर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बहात्तरे यांच्या पथकाने केली असून त्यांच्यासह या तपासात महत्वाची जवाबदारी पार पाडणारे कर्तव्यदक्ष कर्मचारी सुग्रीव केंद्रे यांचे जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यातील रिपाईचे जेष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे,भटके विमुक्त संघटनेते राज्य उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुनील जाधव,रेल्वे मजदूर युनियनचे नेते अशोकजी कांबळे,शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चौधरी दिनेश यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या या कर्तबगारीला जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स परिवाराचा शतशः सलाम...  
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या