💥महापुरुष व समाजसुधारकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी......!


💥पुज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचे प्रतिपादन💥

पूर्णा ; येथील बुद्ध विहार याठिकाणी बुद्ध विहार समिती च्या वतीने दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी भदंत डॉ उपगुप्त महाथेरो व भंते पया वंश यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे हायस्कूलचे प्राचार्य राम धबाले यांच्या अध्यक्षतेखाली व सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे, महेंद्र गोणारकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, महा न धम्म प्रचारक अनागारिक धम्मपाल, समाज सुधारक ई व्ही रामस्वामी पेरियार , यांची जयंती व भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन बुद्ध विहार पूर्णा याठिकाणी संपन्न झाला.

याप्रसंगी सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे , प्रमुख व्याख्याते महेंद्र गोणारकर यांनी मराठवाडा मुक्ती दिन महान  धम्म प्रचारक अनागारिक धम्मपाल, समाज सुधारक व अंधश्रद्धा निर्मूलन ना मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे  पेरियार रामस्वामी व  यशवंत उर्फ सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर यथोचित  प्रकाश टाकला आपल्या प्रमुख मार्गदर्शना मध्ये डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे महत्त्व विशद केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते व सरदार वल्लभाई पटेल गृहमंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भामध्ये कायदाविषयक सल्ला देऊन तत्कालीन गृहमंत्री यांनी पोलीस ॲक्शन घेऊन निजामाच्या जुलमी राजवटी मधून मराठवाडा मुक्त केला.

या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका महत्त्वाची होती अनागारिक धम्मपाल यांचे धम्मकार्य विशद करताना ते म्हणाले बुद्ध धम्म महाबोधी सोसायटी च्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम त्यांनी केले बौद्धगया मुक्ती आंदोलनाचे ते आद्य प्रणेते आहेत थोर समाज सुधारक पेरियार रामस्वामी यांनी समाज सुधारणा व अंधश्रद्धा निर्मूलन ना मध्ये मोठी कामगिरी केली.

समाजाला देव-देवता व कर्मकांडाच्या बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांचं धम्मविषयक कार्य पिता  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां ना अभिप्रेत असलेलं होतं महापुरुष समाजसुधारकाचे आदर्श समाजाने डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. त्यांच्या विचारांमधून नच निकोप समाज निर्मिती होऊ शकते अध्यक्षीय समारोप मध्ये प्राचार्य राम धबाले यांनी महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आव्हान केले.

कार्यक्रमास बुद्ध विहार समितीचे अमृतराव मोरे, वा.रा काळे , इंजिनीयर पीजी रणवीर, पत्रकार विजय बगाटे, विजय जोंधळे, अनिल पंडित शाहीर गौतम कांबळे, मिलिंद कांबळे,भारतीय बौद्ध महासभेचे त्र्यंबक कांबळे, अतुल गवळी किशोर ढाक रग गे, अधिराज फाऊंडेशनचे विशाल कांबळे, त्याचप्रमाणे निरंजना धम्मा सेवाभावी महिला मंडळ रोहिणी धम्म सेवाभावी महिला मंडळ, व  तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या