💥पुर्णा नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना जंतूयुक्त अशुध्द पिण्याचा पाणीपुरवठा नळातून निघताय मृत माश्या...!


💥अशुध्द पाणीपुरवठा देतोय विविध साथीच्या आजारांना निमंत्रण💥

पुर्णा (दि.१७ सप्टेंबर) - पुर्णा नगर परिषदेचा निश्क्रिय व गलथान किरभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसत असून नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसल्यामुळे नगर परिषदेचा कारभार अनियंत्रित झाल्याचे निदर्शनास येत असून सातत्याने प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या भरवशावर असलेल्या नगर परिषद प्रशासनावर कुठल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याचे नियंत्रण नसल्यामुळे शहरात स्वच्छतेसह आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून स्वच्छते अभावी शहरात डासांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास येत असून त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे शहरातील नागरिकांना नगर परिषद पाणीपुरवठा विभागा मार्फत करण्यात येत असलेला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा अशुध्द जंतुयुक्त पाणीपुरवठा केला जात असून नळांद्वारे जिवंत व मृत माश्या येवू लागल्यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाल्याचे निदर्शनास येत असून गणेश महोत्सव काळात पिण्याच्या पाण्याच्या नळांतून जिवंत व मृत माश्या येत असल्यामुळे नागरिकांमध्ये नगर परिषद प्रशासना विरोधात असंतोष निर्माण होत आहे.


नगर परिषद प्रशासनाकडून होणाऱ्या अशुध्द जंतुयुक्त व पिवळसर पिण्याच्या होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य संपुर्णतः धोक्यात आले असून शहरात मलेरीया,टायफाईड,काविळ,डेंग्यू,चिकनगुनीया आदींसह विविध साथींचे आजार फैलत असून सदरील अंघोळीसही योग्य नसून या पाण्यामुळे नागरिकांना चर्मरोगाचे आजारही जडत असल्यामुळे शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालय खचाखच भरलेली निदर्शनास येत आहे अशुध्द जंतुयुक्त पाणीपुरवठा,शहरात सर्वत्र पसरलेली अस्वच्छता जागोजाग तुंबलेल्या नाल्या डोबकाड यामुळे डासांचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे निदर्शनास येत असतांना नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी निलेश सुंकेवार हे मात्र उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.....  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या