💥परळी तालुक्यातील कन्हेरवाडी गावातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गसंबंधी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको...!


💥कन्हेरवाडी ग्रामस्थांचा सरपंच राजेभाऊ फड व श्रीराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उद्या रास्तारोको💥 

परळी (प्रतिनीधी) कन्हेरवाडी गावातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाशी संबंधीत विविध मागण्यासह गावातील रोहित्र दुरुस्त करुन विज पुरवठा सुरळीत करावा या मागण्यांसाठी कन्हेरवाडी ग्रामस्थ उद्या मंगळवार दि.7 सप्टेंबर रोजी सरपंच राजेभाऊ फड व जेष्ठ नेते श्रीराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करणार असुन या रास्तारोको आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 कन्हेरवाडी गावातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.548 बी मध्ये अनेक ग्रामस्थांची घरे व जागा जात आहेत अशा ग्रामस्थांना मावेजा मिळावा,कन्हेरवाडी बाहेरील हद्दीपर्यंत चार पदरी मार्ग बनवावा कन्हेरवाडी हे गाव बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जिरेवाडी येथील सोमेश्वर मंदिराच्या जवळ असल्याने कन्हेरवाडी येथील नदीवर ब्रिज कम केटीवेअर बंधारा बनवून भाविकांना स्नानासाठी नदीच्या बाजुने घाट उभारावेत,गावातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुने नदीपर्यंत नाली बांधकाम करावे याबरोबरच कन्हेरवाडी येथील नादुरुस्त झालेले रोहित्र दुरुस्त करुन विज पुरवठा सुरळीत करावा या मागण्यांसाठी मंगळवार दि.7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा.रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असुन या रास्तारोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कन्हेरवाडी ग्रामस्थांच्या वतिने करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या