💥परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिकांना यांनी केली हादगावात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पहाणी....!


💥या नंतर पालकमंत्री मलीक सेलू तालुक्याकडे रवाना झाले💥

✍🏻किरण घुंबरे पाटील

परभणी :-जिल्ह्याचे पालक मंत्री ना नवाब मललीक यांनी गुरूवारी १६ सप्टेबर रोजी पाथरी तालुक्यातील हादगाव येथे अतीवृष्टीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पहाणी केली.

या वेळी आमदार बाबाजानी दुर्रानी,जिल्हाधिकारी आंचल गोयल ,सहाय्यक पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,जि.प.चे माजी अध्यक्ष राजेशदादा विटेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी अती.मु.का.अ.अजिंक्य पवार ,पोलीस उपअधीक्षक श्रवण दत्त ,उपजिल्हाधिकारी दर्शन निकाळजे तहसीलदार श्रीकांत निळे, कृऊबास सभापती अनिलराव नखाते, पं स सभापती सदाशिव थोरात,बिडीओ सुहास कोरेगावे ,पो.नि.वसंत चव्हाण तालुका कृषी अधिकारी व्ही.टी.शिंदे,उप अभियंता डी.एम.शिंदे, सरपंच बिबिशन नखाते,माजी सभापती, राजेश ढगे रायुकाँ जिल्हाध्यक्ष रितेश काळे,तालुकाध्यक्ष विष्णू काळे यांची प्रमुख उपस्थिती या वेळी उपस्थीती होती. दुपारी तीन च्या सुमारास ते माजलगाव कडून पाथरी येथून हादगाव येथे दाखल झाले या वेळी त्यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पहानी केल्या नंतर हादगाव ग्रा पं अंतर्गत असलेल्या इंदिरानगर भागात असलेल्या वसाहतीत गावातुन गेलेल्या नाल्याच्या पाण्याने नुकसान झालेल्या रहिवाशांच्या घरांची पहाणी करून नागरीकांशी चर्चा केली. या ठिकाणच्या नाल्याच्या पाण्याचा कायम बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांनी लेखी निवेदना व्दारे केली. तर सभापती सदाशिव थोरात यांनी रिलायन्स कंपनी कडे शेतक-यांची संपुर्ण माहिती असतांना ते शेतक-यां कडून कागदपत्रे गोळा करत आहेत. हा प्रकार बंद करून विमा भरलेल्या तालुक्यातील सर्व शेतक-यांना नुकसान भरपाई मिळउन देण्याची मागणी केली.तर कॉ दिपक लिपने यांनी संपुर्ण तालुक्यात अतीवृष्टीने आणि पुराच्या पाण्याने मोठे नुकसान झाल्याने हेक्टरी पन्नास हजारांची मदत देण्याची मागणी निवेदना व्दारे केली. या नंतर पालक मंत्री सेलू तालुक्या कडे रवाना झाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या