💥पुर्णा तालुक्यातील चुडावा येथील विठ्ठल देसाई यांचा वंचित बहुजन आघाडी पक्षांत जाहीर प्रवेश...!


💥त्यांचा जाहिर प्रवेश सोहळा येथील शासकीय विश्राम गृहात संपन्न झाला💥

पुर्णा (दि.१७ सप्टेंबर) - तालुक्यातील चुडावा येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल देसाई यांनी आज शुक्रवार दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी वंचित बहुजन आघाडी पक्षांत पुर्णेतील शासकीय विश्रामगृहा मध्ये वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष आलमगीर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर प्रवेश केला यावेळी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेते व पूर्णा नगर परिषदेचे नगरसेवक दादारावजी पंडित,नगर सेवक ॲड.धम्मा जोंधळे,वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष शाम काळे,वंचित बहुजन युवा आघाडीचे तुषार गायकवाड,राहुल कांबळे,चुडावा येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजी शेळके,मधुकर शेळके,हरी वाघमारे, पिंपळा भत्त्या येथील प्रल्हाद गोडबोले ,रुपला येथील कार्यकर्ते नागोराव दाडे,सुभाष गुंडाळे,गजानन भोसले आदीं मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वंचित बहुजन आघाडी पक्षांमध्ये जाहिर प्रवेश केलेले चुडावा येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल आप्पाराव देसाई यांचा पक्षाचे जिल्हाध्यक्ष आलमगीर खान यांच्यासह विविध मान्यवरांनी सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या