💥मंगरूळपीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचा 'नाॅट रिचेबल' चा मुद्दा ऐरणीवर...!


💥नगर परिषद मुख्याधिकारी पदाचे प्रभारीचे ग्रहण शेवटी सुटणार तरी केव्हा ? शहरवासियांना पडला प्रश्न💥

💥पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थीचा रखडलेला उर्वरीत निधी मिळणेसाठी कार्यालयात धडक💥

💥तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्यास साखळी ऊपोषणाचा इशारा💥


(फुलचंद भगत)

मंगरुळपीर:-नगरपरिषद क्षेञातील घरकुल लाभार्थ्यांना थकलेला ऊर्वरीत निधी अजुनही न मिळाल्यामुळे थेट लाभार्थ्यांनी नगरपरिषद आणी तहसिल कार्यालयावर धडक देवुन आपली व्यथा मांडली.तात्काळ घरकुल निधी प्राप्त न झाल्यास दि.१५ आॅक्टोबर पासुन साखळी ऊपोषणास सुरुवात करणार असल्याचा इशाराही दिला.तसेच सतत नाॅट रिचेबल असणार्‍या मुख्याधिकारी यांचेवर जिल्हाधिकारी यांनी कायदेशिर कारवाई करावी व न.प.चे प्रभारीचे ग्रहण लवकर सोडवावे अशीही मागणी करण्यात आली.


 नगर परिषद मंगरुळपीर येथील कार्यक्षेत्रात राहणारे पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी आहे व हे पाणीपट्टी व घरपट्टी नियमित भरणारे लाभार्थी आहेत. नगर परिषद मार्फत पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे व निवेदनकर्ते हे अंदाजे सन २०१९ साली घरकुल मंजुर झालेले लाभार्थी आहेत. यापैकी काही लाभार्थीना सदर योजनेचा पहिला हप्ता अंदाजे नोव्हेंबर २०१९ मध्ये रु. ४००००/- प्राप्त झालेला आहे. दुसरा हप्ता अंदाजे फेब्रुवारी २०२० मध्ये रु. ४००००/- मिळाला परंतु तिसरा हप्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. अनेकवेळा त्यासंबंधी नगर परिषदेला विचारणा केली असता त्यासंबंधीचा निधी आज येईल उद्या येईल अशाप्रकारे ऊडवाउडवीची उत्तरे घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येत आहेत. सदर प्रकरणी या योजनेतील लाभार्थी अनेक दिवसांपासून भाडयाने दुस-याचे घरात राहून दुसर्‍यांचे जवळून ऊधार, व्याजाने पैसे आणून त्यांनी घरकुल पुर्ण केले. तिसरा हप्ता लवकरच मिळेल आपण घरकुल पुर्ण करा असे न.प.कडुन सांगण्यात आले होते. पण आज अनेक दिवसांपासून तिसरा हप्ता मिळाला नाही व अनेक लाभार्थ्यांच्या अंगावर कर्ज झाले आहे व लाभार्थी मानसिक व आर्थिक त्रास सहन करीत आहेत. तरी आता सर्व लाभार्थ्यांची त्रास सहन करण्याची मर्यादा संपलेली आहे. आपण या सर्व प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन घरकुलाचे उर्वरीत हप्ते लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात यावे अन्यथा दि. १५/०९/२०२१ पासून आम्ही व सर्व लाभार्थी आपल्या कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसु असा इशारा नगरपरिषद आणी मंगरुळपीर येथील तहसिलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमुद आहे.सदर निवेदनावर ३३ लाभार्थ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

💥तहसिलदारांच्या फोनकाॅललाही मुख्याधिकार्‍यांचा प्रतिसाद नाही💥

मंगरुळपीर नगरपरिषद हद्दीतील घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते रखडल्यामुळे ओढवलेल्या आर्थीक संकटांची व्यथा मांडण्यासाठी सदर घरकुल लाभार्थी तहसिलला धडकले आणी आपले निवेदन सादर केले.कर्तव्यदक्ष तहसिलदार नरसैया कोंडागुर्ले यांनी तात्काळ प्रश्न निकाली काढण्यासाठी न.प.चे मुख्याधिकारी यांना दोनदा कालॅ केले परंतु दोनीही वेळी मुख्याधिकारी यांनी काॅल रिसिव्ह न केल्यामुळे तालुका दंडाधिकारी यांच्याच काॅलला अधिकारी जर टाळत असतील तर सामान्य जनतेची समस्या कितपत सोडवल्या जात असेल याविषयी शहरवाशी विवंचनेत पडले आहेत.

💥मंगरूळपीर शहरात डेंगुचा कहर माञ मुख्याधिकारी नाॅटरिचेबल ?💥

शहरात सध्या डेंग्यु,मलेरिया,टायफाइड तसेच डासजन्य आणी दुषित पाण्यामुळे आजाराने थैमान घातले आहे.शहरातील काही वार्डात कचरा साचलेला असुन बर्‍याच ठिकाणी धुरफवारणीही झाली नसल्यांची लोकांमधुन ओरड होत आहे.अशातचगेल्या एकदिड वर्षापासुन न.प.ची धुरा प्रभारीच्याच खांद्यावर असल्यामुळे शहराच्या विकासाचे तीनतेरा वाजल्याचे चिञ आहे.ज्यांचेकडे प्रभार आहे तेही शहरवाशीयांना वार्‍यावर सोडुन नाॅट रिचेबल झाले असल्याची शहरवाशी बोलत आहेत.न.प.पदाधिकारी यांचेच शहराच्या समस्या सांगण्यासाठीचे फोन स्विकारत नसल्याने तिथे सामान्य शहरवाशीयांची काय गत होत असेल ही कल्पना न केलेलीच बरी अशीही खंत व्यक्त केल्या जात आहे.

💥शांतता समिती सभेतही मुख्याधिकारी यांचाच मुद्दा गाजला💥

दि.५ सप्टेबर रोजी ऊपविभागिय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शन आणी ऊपस्थीतीत आगामी सण ऊत्सवाच्या पार्श्वभुमीवर शांतता समितिची बैठक झाली.या सभेतही मंगरुळपीर शहरवाशी विविध आजार आणी समस्येच्या गर्तेत अडकलेत पण मुख्याधिकारी माञ सतत गैरहजर असतात याचा पाढाच वाचन्यात आला.प्रशासनाने वेळीच दखल घेवून मुख्याधिकारी नाॅट रिचेबलचा मुद्दा न सोडवल्यास जिल्हाधिकारी यांचेकडे जावुन न्याय मागण्यात येइल असे सांगण्यात आले.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या