💥" बिबटया पासून घ्यावयाची काळजी " याविषयी आरे कॉलनीत बैठक संपन्न...!


💥आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांच्या सूचनेनुसार सदर बैठक घेण्यात आली💥

बिबट्या संबंधी माहितीपर प्रबोधन व घ्यावयाची काळजी या विषयावर आज आरे कॉलनीतील गावदेवी मंदिराच्या आवारात संयुक्त बैठक घेण्यात आली. आरे कॉलनीतील रहिवाशांवर वारंवार बिबट्यांचा होणारा हल्ला व त्यामुळे रहिवाश्यांच्या मनात निर्माण झालेली भीती यावर यावर योग्य मार्ग काढण्यासाठी आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांच्या सूचनेनुसार सदर बैठक घेण्यात आली.

   स्वयंसेविका ऋतुजा यांनी व वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी बिबट्या संबंधी माहिती देऊन माणसांनी कोणकोणती काळजी घेणे गरजेचे आहे याविषयी विस्तृत चर्चा केली. आमदार रविंद्र वायकर यांनी वन विभागाला हव्या असलेल्या अत्यावश्यक गरजा पुरविण्यात येतील असे सांगून ज्याप्रमाणे माणसांचा जीव रक्षणे गरजेचे आहे त्याप्रमाणेच वन्यप्राणी देखील जगणे तितकेच आवश्यक आहे असे सांगून आरे कॉलनी मधील प्रत्येक पाड्यावरील लोकांना पत्रके देऊन तेथेही समाज प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यासाठी योग्य ते सहकार्य करू असे आश्वासन दिले. पोलिसांना देखील सूचना दिल्या.

या बैठकीस आमदार श्री रवींद्र वायकर, वन अधिकारी गिरिजा देसाई, आरे पोलीस निरीक्षक ज्योती देसाई, नगरसेविका सौ रेखा रामवंशी, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, शालिनी सावंत, विधानसभा समन्वयक ॲड. भाई मिर्लेकर, युवतीसेनेच्या विधानसभा समन्वयक पूजा शिंदे,उपविभाग प्रमुख जितेंद्र वळवी, उपविभाग समन्वयक राहुल देशपांडे, माजी नगरसेवक मेराज शेख, शाखाप्रमुख संदीप गाढवे, बाळा तावडे, महिला शाखा संघटक सौ अपर्णा परळकर, सौ हर्षदा गावडे , शाखा समन्वयक उमेश कदम, युवतीसेनेच्या अर्चना बुरटे , युवासेना शाखा अधिकारी रवींद्र भगत* आदी वन अधिकारी वर्ग आणि पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या