💥परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील तहसिल कार्यालय परिसरात भुखंड माफियांचा पत्रकारावर प्राणघातक हल्ला...!


💥पुर्णा तालुका पत्रकार संघाकडून घटनेचा निषेध ; पत्रकार मो.एजाज यांच्यावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी💥

परभणी/पुर्णा (दि.२२ सप्टेंबर) - जिल्ह्यातील जिंतूर येथील पत्रकार मो.एजाज यांनी काही दिवसापुर्वी शहरातील भुखंड माफियांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्कारींसह विरोधात लिहिलेल्या बातम्यांचा रोष मनात ठेवून काही भुखंड माफियांनी काल मंगळवार दि.२१ सप्टेंबर २०२१ रोजी तहसिल कार्यालय परिसरात मो.एजाज यांना गाठून सिनेस्टाईल मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला सदरील घटना अत्यंत गंभीर व लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याने आज बुधवार दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध नोंदवत पुर्णा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी परभणी यांच्यासह राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना घटने विरोधात निवेदन पाठवण्यात आले आहे.


पुर्णा तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दौलत भोसले यांच्या नेतृत्वाखालील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आज बुधवार दि.२२ सप्टेंबर रोजी तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांच्यासह राज्याच्या गृहमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की जिंतूर येथील पत्रकार मो.एजाज यांच्यावरील समाजकंठकांनी केलेला हल्ला अत्यंत निंदनीय असून या घटनेतील समाजकंठकांवर राज्यात लागू करण्यात आलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत व संबंधित पिडीत पत्रकार मो.एजाज यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे अन्यथा अखील भारतीय पत्रकार संघटना सनदशीर मार्गाने आंदोलन छेडेल असेही निवेदनात म्हटले असून या निवेदनावर तालुकाध्यक्ष दौलत भोसले,तालुका कार्याध्यक्ष मुजीब कुरेशी,मो.अनीस बाबूमिया,अतुल शहाणे,गजानन हिवरे,शेख पाशा शेख फरीद,शेख अफसर शेख सत्तार,नारायन सोनटक्के,सुशीलकुमार दळवी,माधव मोहिते,केदार पाथरकर,संपत तेली,मो.अलीम,चौधरी दिनेश आदींच्या स्वाक्षरी आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या