💥पुर्णा तालुक्यात शिवसेनेला खिंडार ; ताडकळस सर्कल मधील अनेक शिवसैनिकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश...!


💥परभणी जिल्ह्यासह तालुक्यात रुपेशभैया देशमुख यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जोरदार घौडदौड💥

पुर्णा ; तालुक्यात शिवसेनेला उभी खिंडार पडली असून ताडकळस सर्कल मधील शेकडो शिवसैनिकांनी रविवार दि.१९ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झुंजार नेतृत्व तथा परभणी जिल्हाध्यक्ष रुपेशभैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात ताडकळस व परिसरातील असंख्य शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष युवा हिंदुहृदय सम्राट राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तालुका उपाध्यक्ष मारोती मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेमध्ये जाहिर प्रवेश केला.


यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष रुपेशभैया देशमुख यांनी मनसेत प्रवेश केलेल्या अनेक युवकांना विविध पदांचे नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ताडकळस शहर अध्यक्ष म्हणून विलास संभाजी जाधव यांची निवड करण्यात आली याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के,तालुकाध्यक्ष अनिल बुचाले , पूर्णा शहर अध्यक्ष गोविंद ठाकर , कैलास सलगर , ओम घायाळ, वैजनाथ कदम , उमाकांत दळवे ,बालाजी, शेख मुजम्मिल नवनाथ सलगर असे अनेक ताडकळस व परिसरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती .

           या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाध्यक्ष रूपेश सोनटक्के बोलताना म्हणाले समाजाच्या तळागाळातल्या प्रत्येक गरजूंच्या समस्येची निवारण करणे हे आपले प्रथम धर्म व कर्तव्य आहे या वाक्याच्या जवाब म्हणून पूर्णा तालुका उपाध्यक्ष मारुती मोहिते यांनी म्हटले की समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत त्यांची कोणतीही समस्या असो मनसे कार्यकर्ता नेहमीच खंबीरपणे ढाल म्हणून उभा आहे व सतत राहील ही ग्वाही देतो या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल आंबोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मण घोडके यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या