💥पुर्णा तालुक्यातील मौजे बरबडी येथे राष्ट्रीय पोषक आहार जनजागृती सप्ताहा निमित्त कार्यक्रम संपन्न...!


💥या कार्यक्रमास सिडीपीओ वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती💥 

पुर्णा (दि.०७ सप्टेंबर) - तालुक्यातील मौजे बरबडी येथे दि.०२ सप्टेंबर २०२१ रोजी पोषन राष्ट्रीय पोषक आहार जनजागृती सप्ताहातील प्रथम कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमा वेळी सी.डी.पी.ओ वानखेडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले या वेळी बोलताना त्यानी गर्भवती महिलांना पोषक आहारा विषयी व छोट्या मुलांना द्यावयाच्या आहारा संबंधी महत्त्वाच्या सूचना दिल्या व मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमा प्रसंगी सुपरवायझर नागरगोजे,पंचायत समिती सदस्य बालाजी साखरे,बोगळे,सरपंच बालाजी सूर्यवंशी,उपसरपंच सोमनाथ सोलव,अंगनवाडी सेविका गंगाबाई वरपडे,सुनिता काबळे,सुलोचना कळबे,मदतनिस पारूबाई दहिवाळ,सिताबाई शिदे आदींसह गावकरी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या