💥परळी ग्रामीण पोलिसांचे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन...!


💥उपविभागीय पोलीस अधिकारी जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले पथसंचलन💥

परळी वैजनाथ( प्रतिनिधी)-परळी तालुक्यातील मौजे मांडवा येथे गणेशोत्साहाच्या पार्श्वभूमीवर परळी ग्रामीण पोलिसांनी आज उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन केले. आज रोजी पोलीस स्टेशन परळी ग्रामीण हद्दीतील मौजे मांडवा या गावी सकाळी 09:45 ते 10:30 वाजण्याच्या दरम्यान, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी आंबाजोगाई जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेले संपूर्ण हत्यारा सह रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये पोलीस स्टेशनचे 03 अधिकारी , 21अमलदार तसेच 09 होमगार्ड व एस.आर.पी एफ चे 01 अधिकारी व 18 अमलदार हजर होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने मिरवणुकीस बंदीघातली आहे. शासनाने सोशल गॅदरिंगला परवानगी दिली नाही. त्यामुळे या उत्सवाचे पावित्र्य जपण्याचे काम गणेश मंडळाचे आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या