💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - सकाळच्या महत्वाच्या हेडलाईन्स.....!

 


💥मंत्री जितेंद्र आव्हाड यांची लवकरच ईडीकडून चौकशी ; त्यांनी जेलमध्ये जाण्यासाठी बॅग भरावी - किरीट सोमंय्या

 ✍️ मोहन चौकेकर  

☀️मुंबईकर महिलेने टाटा मेमोरियल रुग्णालयाला दान केली तब्बल १२० कोटींची जमीन

☀️गणेश भक्तांना इतर मंडळांचे गणपती पाहता येणार नाही, महाराष्ट्र शासनाची मंडळाना कोरोनाच्या पाश्वभूमीवर आवाहान, लालबागच्या सर्व मंडळांची मुंबई पोलीस आणि पालिकेसोबत पार पडली बैठक 

☀️मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील कांदळवनावर असणार आता “सीसीटीव्ही”ची नजर!

☀️मुंबईत डेंग्यू, मलेरियाचा प्रभाव वाढला आहे, डेंग्यू मलेरियाच्या डासांची उत्पत्ती स्थळं शोधून औषध फवारणी केली जाणार आहे. धोबीघाट भागात या प्रयोगाची यशस्वी चाचणी करण्यात आली.

☀️डोंबिवलीकरांची प्रतीक्षा संपली, दोन वर्षांनी कोपर पूल खुला होणार, आज दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचं ऑनलाईन उद्घाटन होणार आहे.

☀️चिपळूणमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

☀️अमरावतीत वर्धा धरणाची पाण्याची पातळी ३४१.८६ मी एवढी असून धरणात एकूण ९०% पाणीसाठा*

☀️गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती अमावस्येची यात्रा रद्द

☀️दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवात मुंबई-गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ,चाकरमान्यांना गैरसोय होऊ नये यासाठी एकनाथ शिंदेंची घोषणा

☀️“गर्दी करणारे राजकीय, धार्मिक कार्यक्रम नकोच”, मुख्यमंत्र्यांचं राज्यातील पक्ष-संघटनांना आवाहन

☀️राष्ट्रवादीकडून मोठ्या रणनीतीचे संकेत; शरद पवारांनी बोलावली आजी-माजी आमदारांची बैठक*

☀️मंत्री जितेंद्र आव्हाड यांची लवकरच ईडीकडून चौकशी सुरू होणार असल्याने त्यांनी जेलमध्ये जाण्यासाठी बॅग भरावी, असे आव्हानही सोमय्या यांनी दिले. 

☀️पूरग्रस्तांचं विनाअट पुनर्वसन करा; महापुरामध्ये बुडालेल्या पिकांवरील कर्ज माफ करा* -राजू शेट्टी

☀️'भारतातील हिंदू-मुसलमान यांचे पूर्वज एकच आहेत. आपण भारतीय संस्कृतीचे वारसदार आहोत, पण ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर निर्माण केलं. तेव्हापासून आपण भांडण आहोत', -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 

☀️बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता; महाराष्ट्र एकीकरण समितीची पिछेहाट*

☀️वरवरा राव यांना तूर्तास दिलासा, प्रकृती अस्वस्थ्यामुळं वैद्यकीय जामीनाची मुदत हायकोर्टानं वाढवली

☀️धनंजय मुंडेंविरोधात पुरावे द्यायला आलेल्या करुणा शर्मांना गाडीत पिस्तूल ठेवल्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी*

☀️हिरा पन्ना शॉपिंग सेंटरवर पोलिसांची धाड, लाखोंची डुप्लिकेट घड्याळं जप्त

☀️पुणे हादरले ; रेल्वे स्थानकातून अपहरण करून १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार*

☀️कथित कोळसा घोटाळ्याशी निगडीत प्रकरण, अभिषेक बॅनर्जी चौकशीसाठी दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर

☀️'सुपर ३०' चे संस्थापक आणि गणितज्ञ आनंद कुमार यांना 'साराभाई शिक्षक वैज्ञानिक राष्ट्रीय मानद पुरस्कार २०२१' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.*

☀️स्कॉटलंडमध्ये एका मच्छिमाऱ्याला मासेमारी करताना दुर्मिळ निळ्या रंगाचा झिंगा सापडला. किंमत जवळपास २० लाखांच्या आसपास आहे.

☀️‘स्पेस एक्स’ ची पहिली नागरी समानवी अवकाश मोहिम येत्या १५ सप्टेंबरला

☀️पाकिस्तानची दोन विमाने पाडली, तालिबानविरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढणार: मसूद

☀️युएई आणि ओमान येथे होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघाची घोषणा आज (६ सप्टेंबर) संध्याकाळी होण्याची शक्यता आहे.

☀️चंद्रपूर : सचिन तेंडुलकर यांनी पोळ्यानिमित्त त्यांचा मुक्काम असलेल्या रिसॉर्टमध्ये बैलांची पूजा करून शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.

☀️तब्बल ५० वर्षांनी टीम इंडियाने ओव्हलचं मैदान मारलं, इंग्लंडवर १५७ धावांनी मात

☀️पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारी आगामी टी-२० संघाच्या घोषणेनंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस आपल्या पदावरून पायउतार झाले आहेत....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या