💥लहान मुलांसाठी अद्याप लस आलेली नाही त्यामुळे १८ च्या खालच्या वयोगटातील मुला-मुलींसाठी अजूनही लसीची प्रतीक्षाच...!


💥लहान मुलांसाठीची करोना लस कधी येणार ? अदर पूनावालांनी केली मोठी घोषणा💥

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ सप्टेंबर देशभरात सुमारे अडीच कोटी लसीचे डोस देण्यात आले या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातून कौतुक होत असताना दुसरीकडे लहान मुलांसाठी अद्याप लस आलेली नाही त्यामुळे १८ च्या खालच्या वयोगटातील मुला-मुलींसाठी अजूनही लसीची प्रतीक्षाच आहे या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्युटचे सी.ई.ओ. अदर पूनावाला यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 

सिरम इन्स्टिट्युटच्या हडपसरमधील प्लांटमध्येच कोविशिल्ड लसींची उत्पादन सुरू आहे १८ पेक्षा वरच्या सर्वांना ही लस दिली जात असून आता १८ वर्षांखालील वयोगटाच्या लोकसंख्येला देखील लस मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे एका पत्रकार परिषदेमध्ये अदर पूनावाला यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे “लहान मुलांसाठी सिरमच्या कोवावॅक्स लसीच्या चाचण्या अगदी सुरळीतपणे सुरू आहेत जर सर्व चाचण्या आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडली तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये लहान मुलांसाठी लस येईल” असं अदर पूनावाला म्हणाले आहेत “अनेक स्वयंसेवकांना तपासण्यांसाठी लसीचे डोस देण्यात आले आहेत चाचण्या व्यवस्थित सुरू आहेत या वर्षाखेरीसपर्यंत या चाचण्यांचा आढावा घेतला जाईल” असं देखील पूनावाला म्हणाले. 

💥लस किती सुरक्षित ?

दरम्यान, चाचण्यांच्या प्रक्रियेविषयी माहिती देताना अदर पूनावाला म्हणाले, “ही लस लहान मुलांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी आम्हाला किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागेल आम्ही टप्प्याटप्प्याने यावर काम करत आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या