💥गंगरूळपीर येथे गजानन महाराज पारायणानिमित्य महिलांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न....!


💥महिला सदस्यांनी सुमधुर आवाजात भजने गाऊन या पारायणाची सांगता केली💥

फुलचंद भगत

मंगरूळपीर:-येथील बायपास रोडवरील मंदिरामध्ये गजानन महाराज पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते.या पारायण सोहळ्यानिमित्य गणेश भजनी मंडळांच्या महिला सदस्यांनी सुमधुर आवाजात भजने गाऊन या पारायणाची सांगता केली.


         बचतगटाच्या माध्यमातुन तर विविध धार्मिक कार्यक्रम ऊत्सवाच्या औचित्याने गणेश भजनी मंडळांच्या महिला या नेहमी अनेक ऊपक्रम राबवत असतात.मंगरूळपीर येथील बायपास रोडवर असलेल्या मंदिरामध्ये या महिलांनी श्री.गजानन महाराज पारायण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या पारायण सोहळ्याच्या सांगता समारोपीय कार्यक्रमानिमित्य गणेश भजनी मंडळांच्या महिलांनी सुमधुर आवाजात भजने गाऊन मंञमुग्ध केले.तसेच यानिमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक ऊपक्रमही या महिलांनी एकञ येवून राबवले.या कार्यक्रम आयोजनामध्ये लता वानखडे,ऊज्वला म्हातारमारे,सरिता पुरोहित,संगिता डहाके,संध्या व्यवहारे,बेबीताई भेंडेकर,सुमन डहाके,ज्योती वैद्द,चापके,सुडके,शर्मा,सोनल गावंडे,लता म्हातारमारे,सुनिता ठाकरे,गावंडे,जया जाधव आदींनी क्रायक्रम यशस्वीतेकरीता परिश्रम घेतले.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या