💥परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडा सामुहीक बलात्काराचा भाजपाने केला निषेध...!


💥पुर्णा तालुका भाजपाच्या वतीने डिघोळ तांडा घटनेतील नराधमांवर कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी💥  

पुर्णा (दि.२२ सप्टेंबर) - परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडा येथील अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीवर तिघा नराधमांनी सामुहीक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली.

याप्रकरणी सदरील घटनेतील पिडीत मुलीने विष प्राषण करून आत्महत्या केली या घटनेतील नराधम आरोपीना कठोर शिक्षा करावी असे निवेदन आज बुधवार दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्णा तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे तहसिलदार पुर्णा यांच्या मार्फत राज्याचे गृहमंत्री यांना देण्यात आले.यावेळी भाजपा पूर्णा शहराध्यक्ष प्रशांत कापसे,जिल्हा संयोजक विजय कराड,बालाजी कदम,भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष विश्वनाथ होळकर,तालुका संयोजक गोविंद ठाकुर,शहर उपाध्यक्ष रमन ओझा,वैभव भायेकर आदी उपस्थित होते.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या