💥पुर्णा तालुक्यातल्या शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची भारतीय जनता पार्टीची निवेदनाद्वारे मागणी....!


💥भाजपाच्या वतीने तहसीलदार पल्लवी टेमकर यांना आज निवेदन देण्यात आले💥

पुर्णा (दि.०८ सप्टेंबर) - पुर्णा तालुक्यात दि.६ सप्टेंबर  व ७ सेप्टेंबर २०२१ रोजी  झालेल्या अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून नुकग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट सर्वेक्षण करुण त्यांना तातडीने सरसगट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन पुर्णा तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे आज बुधवार दि.०८ सप्टेंबर २०२१ रोजी पुर्णेच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांना देण्यात आले.

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन,तुर,कापूस,हळद,मुग,उस या पिकाचे मोठ्या प्रमाणात प्रचंड़ नुकसान झाले आहे तरी या पिकांचे तत्काळ पंचनामे करुण शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब कदम ,जिल्हा उपाध्यक्ष बालाजी रुद्रवार, तालुका अध्यक्ष अनंतराव पारवे ,प्रदेश कार्यकारणी सदस्य किसान मोर्चा बळीरामजी कदम ,जिल्हा संयोजक विजय कराड,किसान मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतापराव काळे ओबीसी तालुकाध्यक्ष शिवदास शिराले ,युवा जिल्हा सचिव विजय साखरे, शिवकुमार शिराळे युवा शहराध्यक्ष विश्वनाथ होळकर , भगवानराव काळे ,मोकिंदरावजी तनपुरे ,दिलीपराव भोसले ,दिलीपराव मोहिते ,संजयराव भोसले यांच्यासह आदि उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या