💥दक्षिण मध्य रेल्वे महाव्यवस्थापक गजानन जी माल्या यांचा दौरा 99% रद्द...!


💥पुढील निरीक्षण प्रवासी दौरा येत्या ऑक्टोबर महिन्यात होईल अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रेल्वे सेनेला मिळाली💥

औरंगाबाद ; दक्षिण मध्य रेल्वेचे मनमिळाऊ प्रवासी प्रिय तात्काळ निर्णय घेऊन सुखद अनुभव देणारे महाव्यवस्थापक श्री गजानन जी माल्या यांचा दि.२५ सप्टेंबर २०२१ रोजीचा मनमाड ते औरंगाबाद जालना व पुढील प्रवासी सवांद पाहणी निरीक्षण दौरा हा रद्द होणार आहे.

या संदर्भात अधिकची माहिती अशी मिळते की केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना.रावसाहेब जी दानवे यांच्या सोबत सिकंदराबाद येथे आज शुक्रवार दि.२४ सप्टेंबर २०२१ रोजी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे कळते पुढील निरीक्षण प्रवासी दौरा येत्या ऑक्टोबर महिन्यात होईल अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून रेल्वे सेना अध्यक्ष यांना मिळाली आहे तरी रात्री उशिरापर्यंत निर्णय घेतला जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या