💥स्वच्छता संवाद उपक्रमात जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन💥
✍🏻फुलचंद भगत
वाशीम:-भारताच्या 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हयात स्वच्छतेचा महाजागर सुरु असुन यामध्ये दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता सर्व सरपंच व ग्रामसेवकांसोबत स्वच्छता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम हे ऑन लाईन पध्दतीने झुम ॲपच्या साह्याने जिल्ह्यातील सर्व 491 सरपंचासह ग्रामसेवकांसोबत स्वच्छतेच्या विषयावर संवाद साधणार आहेत. याबाबत सर्व गटविकास अधिकारी यांना व्हाटसॲपच्या माध्यमातुन पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत.
स्वच्छता संवाद उपक्रमात जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले यांनी केले आहे.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
0 टिप्पण्या