💥परळी येथील रुद्राक्ष गणेश मंडळाने केले रेकॉर्डब्रेक 539 जणांचे लसीकरण...!


💥यावर्षीचा कार्यक्रम मंडळाचे सदस्य स्वर्गीय राहुल लढ्ढा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ठेवण्यात आला💥

परळी (प्रतिनिधी) : रुद्राक्ष गणेश मंडळ दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करीत आलेला आहे यावर्षी करुणा महामारी च्या प्रतिबंधात्मक लस देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी कोविशिल्डआणि कोवक्सिन या दोन्ही लस देण्यात आल्या. यावर्षीचा कार्यक्रम मंडळाचे सदस्य स्वर्गीय राहुल लढ्ढा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ठेवण्यात आला.

सदरील कार्यक्रम पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित झाला. यावेळी पंचायत समितीचे सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे यांचे विशेष सहाय्य लाभले. या कार्यक्रमास रुद्राक्ष गणेश मंडळाचे राहुल भोकरे, सागर धोकटे ,बालाजी वसंतराव मुंडे, नरेश चिकणे,राहुल गुट्टे , गजानन देशमुख, गजानन झुंजे,कपिल देशमुख, राहुल भोकरे, निखिल गुंडाळे ,प्रथमेश समशेट्टी,भावेश पटेल ,राजेश पटेल ,भूपेंद्र पाठक ,निलेश कसबे, शैलेंद्र आदवडे ,श्रीनाथ चव्हाण ,अमित कदम, रवी ओपले, ज्ञानेश्वर कोलते इत्यादी उपस्थित होते.

सदरील कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल रुद्राक्ष गणेश मंडळ मोंढा परिसरातील सर्व व्यापारी वर्गाचे आभार मानत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या