💥एचएआरसी संस्थे तर्फे 300 एचआयव्ही ग्रस्त बालकांना पोषक आहाराचे वाटप....!


💥एचएआरसी संस्थेने पोषक आहार सप्ताह निमित्त राबवला कौतुकास्पद उपक्रम💥

सध्या राष्ट्रीय पोषक आहार जनजागृती सप्ताह सुरू असून यात कुपोषण टाळण्यासाठी विविध उपाययोजना सोबत एचआयव्ही एड्स सारख्या दुर्धर आजारग्रस्त बालकांच्या आहारात पोषक पदार्थांच्या वापरा विषयी जनजागृती आणि मदत या उपक्रमाचे आयोजन होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) या संस्थेतर्फे करण्यात आले. आज दि 7 सप्टेंबर मंगळवार रोजी पोषक आहार सप्ताह निमित्त एचएआरसी संस्थे तर्फे एआरटी विभाग जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात एचएआरसी संस्थे तर्फे 300 एचआयव्ही ग्रस्त बालकांना महिना भर पुरतील इतक्या पॅकिंग पेंड खजूर चे वाटप करण्यात आले. 

या उपक्रम निमित्त एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले "कुपोषण , कमी वजन असणे शिवाय अपुरा पोषक आहारामुळे एचआयव्ही एड्स सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त 0 ते 18 वयोगटातील  बालके अनेक वेळा संधी साधू आजारांना बळी पडतात. अशा वेळी मुलांना कॅल्शियम, लोह, प्रथिनयुक्त पोषक आहाराची गरज असते. पण अनेक वेळा बाजारात मिळणारी महागडी मल्टिव्हिटॅमिन, आयर्न टॉनिक वगैरे मुलांना आवडत नाही किंवा पचत नाही. अशा वेळेस पारंपारिक पोषक आहार मुले आवडीने खातात. म्हणून  एचएआरसी संस्था तर्फे 300 एचआयव्ही ग्रस्त बालकांना वाटप करण्यासाठी 150 किलो पेंड खजूर च्या (250 ग्राम च्या 600 पॅकेट)  एआरटी विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी व नोडल ऑफिसर डॉ मस्के यांच्याकडे सुपूर्द करत आहोत"

"आज वाटप तसेच सुपूर्द करण्यात आलेल्या पेंड खजूर पॅकेट्स एचआयव्ही ग्रस्त बालकांना त्यांच्या एआरटी औषधोपचार सोबत देण्यात येतील." असे वैद्यकीय अधिकारी डॉ कुलकर्णी मॅडम यांनी सांगितले 25/- प्रति माह व्हाट्सअप्प ग्रुपची सामाजिक बांधिलकी: ब्राम्हणगाव येथील पुरुषोत्तम काळदाते व मित्र परिवाराने 25/- प्रति माह या नावाने सामाजिक व्हाट्सअप्प ग्रुप केला असून. ते सर्व सदस्य प्रति माह 25/- प्रमाणे वार्षिक 300/- प्रत्येक सदस्य दरवर्षी एचएआरसी संस्थेला मदत करतात. या उपक्रमासाठी या 20 सदस्यांनी 6000/- रुपयांची मदत एचएआरसी संस्थेला दिली ज्यातून 150 किलो पेंड खजूर चा जवळपास निम्मा खर्च साठी हातभार लागला. 

या प्रसंगी नोडल ऑफिसर डॉ संजय मस्के,  एआरटी विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ सौ मंजुषा कुलकर्णी, डॉ मार्डीकर, डॉ पालवे, समुपदेशक अनुराधा बेर्डे, सुरेखा जाधव, विशाल कापबोईना, चव्हाण, गलांडे, जोशी, आदमाने आदी स्टाफ उपस्थित होते या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी  एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, सत्यनारायण चांडक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ किशोर सुरवसे, पुरुषोत्तम काळदाते, डॉ सुनील मिश्रा, सौ अर्चना वट्टमवार, श्रीरंग पांडे, ज्ञानेश काळदाते,  अक्षय व कृष्णा काळदाते, व्यंकटेश तुरे, आकाश जाधव,गजानन वैरागड,शुभम देशमुख, अनिल सांगळे, श्रीअंश पांगारकर, आकाश जाधव, अजय पोळके, चक्रधर शिंदे यांनी प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या