💥भारतीय रेल्वेचा नवीन ‘3 ए.सी.(ए.सी.) इकॉनॉमी कोच’ प्रवाशांच्या सेवेत दाखल...!


💥प्रयागराज-जयपूर एक्सप्रेसला हा कोच जोडण्यात आला आहे💥

भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना जास्तीतजास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच विविध उपाययोजना केल्या जातात आता भारतीय रेल्वेच्या या विकासात्मक प्रवासात नवीन ए.सी. थ्री टायर इकॉनॉमी क्लास कोचचा देखील प्रवेश झाला आहे या नवीन कोचने आपली सेवा देण्यास सुरुवात केली आहे प्रथमच, ट्रेन क्रमांक 02403 प्रयागराज-जयपूर एक्सप्रेसला हा कोच जोडण्यात आला आहे 3-ए.सी. कोचमधील ७२ बर्थच्या तुलनेत नवीन ए.सी. इकॉनॉमी कोचमध्ये ८३ बर्थ आहेत.


तसेच, या कोचची भाडे रचना 3 ए.सी.(A.C.) कोचपेक्षा ८ टक्के कमी आहे त्यामुळे प्रवाशांना कमी पैशात प्रवासाचा चांगला अनुभव मिळणार आहे उत्तर-मध्य रेल्वे झोनला भारतीय रेल्वेने अशात हे चार कोच दिले आहे यामधील प्रवासासाठी तिकीट बुकींग सुरू झालेली आहे या ट्रेनमध्ये प्रवाशांना बऱ्याच सुविधा मिळणार आहेत. 

यामध्ये सात कोच असून प्रत्येक कोचमध्ये सहा सी.सी.टी.व्ही. बसवलेले आहेत सुरुवातीला, ५० नवीन 3ए.सी.(A.C.) इकॉनॉमी कोच वेगवेगळ्या झोनमध्ये सेवा देण्यासाठी तयार आहेत प्रयागराजहून जयपूर स्पेशल ट्रेनमध्ये दिव्यांगांसाठी खास शौचालय देखील तयार करण्यात आले आहे याचबरोबर करोनाच्या बचावासाठी ऑटोमेटिक वॉश बेसिन देखील आहे ज्यावर पायाने दाबून पाण्याचा वापर केला जाऊ शकतो याशिवाय प्रत्येक सीटवर चार्जिंग पॉईंट आणि ए.सी. कंट्रोलर देखील देण्यात आले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या