💥पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे पोषण महा सप्ताह संपन्न....!


💥असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावातील सरपंच शिवाजी साखरे यांची उपस्थिती💥 

पुर्णा ; तालुक्यातील धनगर टाकळी येथे दि.१८ सप्टेंबर २०२१ रोजी पोषण महा चा कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावातील सरपंच शिवाजी साखरे तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य साखरे,दिपक कुलकर्णी,गावातील सेविका,इतर सेविका महिला उपस्थित होत्या तर बिटच्या पर्यवेक्षिका मनीषा काळे यांनी प्रास्ताविक केले .यावेळी माहिती देतांना चौरस आहार कुपोषण ,बालंकाचे वजन,उंची, दडंघेर, घेने विषयी,मुलांचे सामाजिक लेखा परीक्षणाची आवश्यकता काय आहे हे समजावले.  किशोरवयीन मुलींचे हिमोग्लोबिन, गरोदर मातेचा आहार,स्तनपान,  बालकांचे संगोपन,बेटी बचाओ बेटी पढाओ , माझी कन्या भाग्यश्री या विषयावर सविस्तर मार्गदर्शन उपस्थिताना केले.

दोन मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करनारे जोडपे यांचा त्या ठीकाणी सत्कार करण्यात आला.  सरपंच शिवाजी साखरे यांना कोल्हापूर येथे आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार मिळाला त्यांचा ही सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले आहार प्रात्यक्षिका मध्ये 1,2,3,4 नंबर काढुन बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंगनवाडी सेविका  सुशिला पांचाळ यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या