💥पंजाबराव डख यांची राज्य शासनाच्या कृषी सल्लागार समितीत नियुक्ती करावी...!


💥आ.बाबाजानी दुर्राणी यांची पालक मंत्र्यांकडे मागणी ; पालकमंत्र्यांनी केली कृषी मंत्र्यांना शिफारस💥

✍🏻किरण घुंबरे पाटील

पाथरी:-परभणी जिल्याचे भुमीपुत्र सेलू तालुक्यातील गुगळी धामनगाव चे रहिवाशी प्रगतिशील शेतकरी तथा हवामान अभ्यासक म्हणून ख्यातनाम असलेले पंजाबराव डख यांची कृषी विभागा आत्मा अंतर्गत राज्य शासनाच्या कृषी सल्लागार सदस्य पदी नियुक्ती करण्याची मागणी आ बाबाजानी दुर्रानी यांनी शुक्रवार २६ ऑगष्ट रोजी पालकमंत्री ना. नवाब मलीक यांच्या कडे केली असुन पालक मंत्र्यांनी तात्काळ दखल घेत  कृषीमंत्री ना. दादाजी भुसे यांना पत्र देऊन पंजाबराव डख यांची कृषी सल्लागार सदस्य पदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे.

  प्रत्‍येक जिल्‍ह्यात कृषी तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा म्‍हणजेच आत्‍मा (ATMA) ही संस्‍था शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्‍या बरोबरच शेतकऱ्यांची नेमकी गरज ओळखून मार्गदर्शनाचे कार्य करीत असते. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवाना शेतकरी योजना संदर्भात माहिती नसते. शेतकरी योजना विषयी माहिती असो, शेतकरी अनुदान विषयी माहिती किंवा इतर शेती संदर्भातील योजनेची माहिती नसते. त्या मुळे या सर्व योजनांची माहिती आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जात असते.

 परभणी जिल्ह्यातील मु. पो. गुगळी धामणगाव, ता. सेलू येथील पंजाब उत्तमराव डख हे संपूर्ण राज्याचा हवामान अंदाज अचूकपणे घेऊन शेतकऱ्यांना मोठी मदत करणारे हवामान तज्ञ व प्रगतीशील शेतकरी आहेत.पंजाब डख यांची राज्य शासनाच्या आत्मा अंतर्गत राज्यस्तरीय प्रगतिशील शेतकरी या गटातून कृषी सल्लागार समितीमध्ये नियुक्ती करावी अशी मागणी  आ बाबाजानी दुर्रानी यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांना शुक्रवारी २६ ऑगष्ट रोजी केली. या मुळे आता सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल होणार आहे. तसेच  डख यांच्या निस्वार्थी सेवेचा सन्मान होईल असे आ दुर्रानी यांनी शिफारस पत्रात म्हटले आहे.

या मागणीवर पालकमंत्री यांनी ना कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पंजाबराव डख यांच्या नावाची शिफारस केली आहे. याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असा विश्वास त्यांनी दिला असल्याचे आ दुर्रानी म्हणाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या