💥परळी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष गोविंद कराड यांची निवड...!


💥प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके यांनी नियुक्तीपत्र दिले💥 

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :-  युवकांचे संघटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे करणाऱ्या गोविंद कराड यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या परळी तालुकाध्यक्ष म्हणून निवडले असून रायुकॉचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड  यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याभरात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. परळी मतदार संघातही युवकांची शक्ती राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे. तालुक्यातील लिंबोटा येथील गोविंद रमेश कराड हे राष्ट्रवादीच्या माध्यमातून युवकांच्या प्रश्नावर लढून त्यांना न्याय मिळवून देतानाच राष्ट्रवादीच्या मागेही युवा शक्ती उभी करतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबुब शेख, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे व जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके यांनी गोविंद कराड यांच्याकडे रायुकांच्या परळी तालुकाध्यक्षाची जबाबदारी सोपवली असून रविवारी बीड येथील राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी रायुकॉचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष मुंडे, पांगरीचे उपसरपंच श्रीनिवास मुंडे, माधव मुंडे, आदींची उपस्थिती होती. गोविंद कराड यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या