💥परभणीच्या कर्तव्यकठोर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांचा धाडसी निर्णय.....!💥एकाच जागी सहावर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या जिल्हाधिकारी गोयल यांनी काढले आदेश💥

परभणी (दि.९ ऑगस्ट २०२१) – जिल्ह्यातील जिल्हा व तहसिल प्रशासनातील महसुल प्रशासनात ज्या कर्मचाऱ्यांच्या एकाच ठिकाणी सहा वर्षा पेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी केल्या असून महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समुपदेशन करुन पात्र कर्मचारी यांच्या बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ हजर होण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हातात आदेश दिले आहेत.

आपल्याला उपलब्धतेनुसार कर्मचाऱ्यांना मनाजोगे ठिकाण मिळालेले आहे. नवीन ठिकाणी बदली झालेले कर्मचारी यापुढेही चांगली सेवा बाजावतील असा विश्वास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केला बदली झाल्यामध्ये सहा वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेले मंडळ अधिकारी,अव्वल कारकुन, लिपिक यांचा समावेश आहे. कर्मचारी उपलब्धतेनुसार ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशा ठिकाणीकर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या. 

यावेळी निवड मंडळाचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, सदस्य तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सदस्य तथा उपजिल्हाधिकारी सामान्य संजय कुंडेटकर उपस्थित होते. यासाठी संगणक सहकार्य जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर, प्रोग्राम मॅनेजर निरज धावनगावे यांनी केले....

00000

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या