💥मुंबईत लाच घेणारे तीन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात....!


💥तक्रारदार व्यक्तीकडून हे आरोपी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात💥 

मुंबई : इमारतीच्या नळजोडणीला परवानगी देण्यासाठी दोन लाख ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या ई विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ए.सी.बी.) अधिकाऱ्यांनी पकडले.

तक्रारदार व्यक्तीकडून हे आरोपी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात सापडले यात सचिन गणपत खोदडे वय ३९ वर्षे आणि विश्वंभर प्रल्हादराव शिंदे वय २८ वर्ष अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार व्यक्ती कार्यरत असलेल्या विकासकाला इमारतीचा निवासी दाखला मिळाला नव्हता त्यामुळे इमारतीचा पाणीपुरवठा सुरू होऊ शकला नाही परिणामी मानवतेच्या दृष्टीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी तक्रारदाराने पालिका अधिकाऱ्यांकडे केली होती शिंदे याने नळजोडणी देण्यासाठी सुरुवातीला दोन लाख रुपयांची मागणी केली. एसीबीने  सापळा रचला होता यावेळी खोदडे याने दोन लाख ५० हजार द्यावे लागतील असे तक्रारदाराला शिंदेमार्फत सांगितले लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने पकडले. 

आरे वसाहतीचा अधिकाऱ्यालाही पकडले अन्य एका कारवाईत गोरेगाव येथील आरे दुग्ध वसाहतीत घर आणि दुकान अनधिकृत असल्याचे सांगून कारवाई न करण्याकरिता लाच मागणाऱ्या उपमुख्य दक्षता अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडला असून त्या लाचखोराचे नाव उदास दाजी तुळसे वय ४८ वर्ष असे आहे त्याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची मागणी केली होती त्यातील १० हजार रुपये स्वीकारताना एसीबीने त्याला पकडले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या