💥देशातील पोलिसांची जनमाणसातील नकारात्मक प्रतिमा सुधारणं हे मोठं आव्हान ; पंतप्रधान नरेंद्र मोदी


💥'तुम्ही व्यवस्थेला बदलणार की व्यवस्था तुम्हाला, हे तुमच्या निर्धारांवर अवलंबून ; पोलिसांची प्रतिमा सुधारणं मोठं आव्हान'💥

नवी दिल्ली ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१९ बॅचच्या आयपीएस प्रोबेशनर्ससोबत  संवाद साधला. यात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी एक एक करून पोलिस अधिकाऱ्या चर्चा केली. देशातील पोलिस यंत्रणा अधिक उत्तम करण्याच्या दिशेने पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह राज्यमंत्री नित्यानंद रायही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.'तुम्ही व्यवस्थेला बदलणार की व्यवस्था तुम्हाला, हे तुमच्या निर्धारांवर अवलंबून आहे. पोलिसांची प्रतिमा सुधारणं हे मोठं आव्हान आहे' असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

सामन्यांमध्ये असलेली पोलिसांची नकारात्मक प्रतिमा पुसणं हे मोठं आव्हान आहे. करोनाच्या सुरवातीच्या काळात यात काहीशी सुधारणा झाली. त्यावेळी पोलिसांकडून गरीब आणि गरजूंना मोठ्या प्रमाणावर मदत केली गेली. तरीही नकारात्मकता कायम आहे. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणं ही नव्या पिढीची जबाबदारी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या काही वर्षांत पोलिस दलात मुलिंचा समावेश अधिकाधिक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्या देशाच्या मुली या पोलिस सेवेत दक्षता आणि उत्तरदायीत्वासोबतच नम्रत, सुलभता आणि संवेदनशीलतेच्या मूल्यांना अधिक सशक्त करतात, असंही ते म्हणाले. हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमीतील सोबत पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते.

करोनाविरोधी लढाईल आपल्या पोलिसांनी देशातील जनतेसोबत खांद्याला खांदा लावून काम केलं. या प्रयत्ना अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या पोलिसांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तुमच्या सेवा या देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत आणि शहरांमध्ये असतील. अशावेळी एक मंत्र कायम ठेवायचा आहे. कुठलाही निर्णय घेताना त्यात देशहित आणि राष्ट्रीय दृष्टीकोन असला पाहिजे. तुम्ही 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चे ध्वजवाहक आहात हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. यामुळे तुमच्या प्रत्येक पावलात आणि प्रत्येक हालचालित Nation First, Always First ची भावना दिसली पाहिजे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

१९३० ते १९४७ मध्ये स्वातंत्र्यासाठी देशातील संपूर्ण तरुण पिढी एकजूट झाली होती. आता तोच मनोभाव तुमच्यात अपेक्षित आहे. त्यावेळी देशातील नागरिक स्वातंत्र्यासाठी लढले होते. आता तुम्हाला सुराज्यसाठी पुढाकार घ्यायचा आहे. तुमच्या युवा साथिदारांसोबत बातचीत करण्याचा माझा प्रयत्न असतो. तुमचे विचार समजण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचे विचार, प्रश्न, उत्सुकता मला पुढील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सहायक ठरतील. यंदाचा १५ ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन हा आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे ७५ वे वर्ष आहे. गेल्या ७५ वर्षांत भारताने एक चांगली पोलिस सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस प्रशिक्षणासाठी निगडीत पायभूत सुविधांमध्येही अलिकडच्या वर्षांमध्ये मोठ्या सुधारणा झाल्या आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या