💥परभणी जिल्ह्यातील शिवसेनेच्या एकमेव ढाण्या वाघाची डरकाळी ; राष्ट्रवादीला कधीही बुडवू खा.जाधव यांची घोषणा...!


💥घनसावंगी तालुक्यातील शिवसेना आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी खासदार संजय जाधव यांची संतप्त प्रतिक्रिया💥 

परभणी (दि.०९ ऑगस्ट २०२१) ; परभणीच्या आयएएस महिला जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरून जिल्ह्यात सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला असून परभणी लोकसभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या घनसावंगी येथील शिवसेनेच्या तालुका मेळाव्यात जिल्ह्यातील शिवसेनेचा एकमेव ढाण्यावाघ म्हणून ओळख असलेल्या खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी जिल्हाधिकारी नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादावर संतप्त प्रतिक्रिया देत शेवटी आपले मौन सोडले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले की ‘आपले घ्यायचे झाकून अन् दुसर्‍याचे पहायचे वाकून’ ही राष्ट्रवादीची प्रवृत्ती झाली आहे.

 लोकसभा मतदारसंघांतर्गत घनसावंगी या तालुकास्थानी शिवसेनेने आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी खासदार जाधव यांनी परभणीच्या जिल्हाधिकार्‍यांच्या नियुक्तीच्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तुफान हल्ला चढवला. नूतन जिल्हाधिकारी या पदासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे केवळ शिफारस केली होती. परंतु, राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी त्यावरुनच आपल्या विरोधात अक्षरशः रान पेटवले ते एवढे की आपण जणू मोठा अपराधच केला, असे नमूद करीत राष्ट्रवादीला सगळं जमतं 'आपलं घ्यायचे झाकून अन् दुसर्‍याचे पहायचे वाकून' ही राष्ट्रवादीची प्रवृत्ती आहे, अशी संतप्त व कडवट प्रतिक्रियाही खासदार जाधव यांनी व्यक्त केली. कुठं कुठं आमच्यासुध्दा भावना अनावर होतात, हे लक्षात ठेवा. शेवटी काही मर्यादा असतात, कुठपर्यंत शांत बसायचं, कुठपर्यंत सहन करायचं, शेवटी 'माकडीन सुध्दा गरज पडली की स्वतःच्या पिल्लांना पायाखाली घेऊन बुडवते' आम्हीही राष्ट्रवादीला कधीही बुडवू असा संतप्त इशारासुध्दा खासदार संजय जाधव यांनी दिला असल्याने जिल्ह्यात सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे निदर्शनास येत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या