💥वाशिम जिल्ह्यात अवतरली खाकीतली आधुनिक साविञी....!


💥अन् संगीताताईंनी सामाजिक जाणिवेतून भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना मोफत ज्ञानदानाचे काम सुरू केले💥 

वाशिम(फुलचंद भगत): राज्यात सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी शासनाकडून सर्व शिक्षा अभियान राबवलं जाते. कोट्यवधी रुपये शिक्षणावर खर्च केले जात आहेत. तरीही अजून अनेक मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. मात्र, वाशिम पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले यांनी सामाजिक जाणिवेतून भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना मोफत ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे. 


भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्तव्यापलीकडे जाऊन ज्ञानदानाचे पवित्र काम त्या करत आहेत.त्यांमुळं या पालावरील मुलांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य दिसून येत आहे. समाजातील प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही भटकंती करणाऱ्या समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूरच असल्याचे पहायला मिळते. या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील एक आधुनिक सावित्री धडपड करत आहे. संगीता ढोले असे त्यांचे नाव असून त्या वाशिम पोलीस दलात कार्यरत आहेत. संगीता ढोले यांच्या प्रयत्नामुळे पालावर गेल्या वर्षभरापासून बाराखडीचा आवाज घुमत आहे. शिक्षण मिळाल्याने मुलांना अक्षराची, एबीसीडीची ओळख झाली. आता ही मुले शिकून मोठ्या नोकरीवर जाण्याची स्वप्न बघत आहेत. तर पालकांनाही आपल्या पाठीशी कुणीतरी असल्याचा आनंद आहे. मुलांना शिक्षण मिळाल्याने समाज सुधारेल, अशी आशा पालकांना आहे.


प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या