💥"बहुजनांनी एकत्र आल्या शिवाय परिवर्तन होणार नाही" - अनिल कांबळे


💥हे जग बदलण्यासाठी लेखणीचा घाव घातला पाहिजे असेही अनिल कांबळे म्हणाले💥

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या  जयंतीचा102 व्या जयंती कार्यक्रमात अनिल कांबळे म्हणाले ,अतिशय थाटामाटात संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील बहुजन वादी वक्ते मस्टर अनिल कांबळे हे होते पुढे बोलताना कांबळे म्हणाले देशात व महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तन राजकीय परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तन करायचे असेल तर सर्व बहुजनवादी लोकांनी एकत्र आलं पाहिजे जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून मानसन्मानाने जगलो पाहिजे यासाठी अण्णाभाऊ साठे नि संघर्ष केला अंधश्रद्धा चली रीति परंपरेवर वार करण्यासाठी अण्णाभाऊ म्हणाले... जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला माणूस अण्णाभाऊ साठे मार्क्सवाद आंबेडकरवाद असा लांबलचक प्रवास केलेल्या या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशिया मध्ये जाऊन गायला  एकाच दिवसाची शाळा शिकलेल्या माणसाने एवढे मोठे तत्वज्ञान आपल्याला सांगून गेला हे आता बहुजनांनी लक्षात घेतलं पाहिजे समाजावर होणारा अन्याय अत्याचार यासाठी हे जग बदलण्यासाठी लेखणीचा घाव घातला पाहिजे असे अनिल कांबळे  म्हणाले.


या कार्यक्रमाचे आयोजन अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष गोविंद शेलार सचिव योगेश सौदागर यांनी केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष  तानाजी भाऊ बनसोडे हे होते प्रमुख वक्ते म्हणून अनिल कांबळे यांनी विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य अशोक सौदागर, नितीन कांगणे ,पाटील अमोल भाऊ शिरसाट ,गायरान हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रशांत मुनवर ,समाज सेवक रिचर्ड बत्तीसे ,कडू शेलार मामा ,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकापउपअध्यक्ष   अमोल भैया त्रिभुवन ,गावचे पोलीस पाटील विनोदभाऊ त्रिभुवन ,औरंगाबाद चे युवा नेते कुणाल जी कदम, विनोद शेलार सर ,माणुसकी फाउंडेशन चे अक्षय वायकोस ,एम आय एम चे शहराध्यक्ष जुनेद भाई शेख ,छोटू भाई पठाण ,उद्योजक रमेश जाधव पाटील ,गुत्तेदार मुजु पठाण ,भाऊसाहेब खेत्रे ,ज्ञानेश्वर ठोकळ ,बॉडी बिल्डर विक्रांत जाधव ,अमित नाडे ,अक्रम भाई बेग, अजित जाधव ,सुरेश सोनवणे युवा नेते दीपक गायकवाड आदी मान्यवर बरोबरच गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद शेलार योगेश सौदागर व जयंती मंडळातील पदाधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या