💥महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या औरंगाबाद विभागाच्या कार्याध्यपदी प्रा.प्रविण फुटके यांची निवड....!


💥तर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीच्या विभागीय सचिवपदी अतुल बेंडे यांची नियुक्ती💥

परळी वैजनाथ (दि.०३ जुन २०२१) महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या औरंगाबाद विभागाच्या कार्याध्यपदी येथील प्रा.प्रविण फुटके यांची तर युवा आघाडीच्या विभागीय सचिवपदी अतुल बेंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या संपूर्ण महाराष्ट्रात सध्या नवीन नियुक्त्या करण्यात येत आहेत. यामध्ये येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रा. प्रविण फुटके यांची प्रांतिक तैलिक महासभेच्या औरंगाबाद विभागाच्या कार्याध्यपदी तर युवा कार्यकर्ते अतुल बेंडे यांची  युवा आघाडीच्या विभागीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा.प्रविण फुटके व अतुल बेंडे यांनी शनैश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य केले. जिल्ह्यातील पहिला वधूवर पालक परिचय मेळावा यशस्वी पणे घेतला. तसेच कोरोना काळात समाजातील गोरगरीब लोकांना समाजातील दानशूरांना एकत्र करून मदत केली या कामाची दखल घेत निलड केली आहे. यासंदर्भात नुकतेच नियुक्ती पत्र मेलद्वारे प्राप्त झाले आहे. या नियुक्त्या महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदासजी तडस, महासचिव डॉ भूषण कर्डिले, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, कोषाध्यक्ष गजानन शेलार, सहसचिव बळवंत मोरघडे, सहसचिव संजिव शेलार, सेवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुहास पन्हाळे, निलेश सोनवणे, गणेश पवार यांनी केल्या आहेत. या निवडीबद्दल बोलताना प्रा.प्रविण फुटके यांनी सांगितले की, मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात समाज संघटन वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. समाजाच्या समश्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रा फुटके यांनी सांगितले.नियुक्ती बदल संगमेश्वर फुटके, युवानेते पवन फुटके, चंद्रशेखर फुटके यांच्या सह परिवारातील व मित्रमंडळींनी, शनैश्वर प्रतिष्ठान चे सर्व विश्वस्त अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या